अभिनेत्री दीपिका पादुकोण आता दुसऱ्यांदा आई होण्यासाठी तयार आहे याच दरम्यान तिने तिच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये असे दिसते की गरोदरपणात येणाऱ्या आव्हानांबाबत स्थिती दाखवलेला व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
अभिनेत्री दीपिका (deepika)पादुकोणला आता तिसरा महिना सुरू आहे आण तिने जो सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये असे दर्शवते ती तिसऱ्या महिन्यात तिला बाथरूम कडे जाणे ही मुश्किल आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला हळूहळू बाथरूम कडे जात आहे अशा प्रकारे की एखाद्या व्यक्तीची तारेवरची कसरत कशी असते त्याप्रमाणे सध्याची स्थिती तिची दर्शवणारा हा व्हिडिओ आहे.
या पोस्टला उलटा स्माईली इमोजी कॅप्शन दिला आहे, ज्यामुळे चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल दिलासा मिळाला आहे. दीपिका आणि रणवीरने एप्रिलमध्ये त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली होती. तिने इंस्टाग्रामवर एक गोड पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांची मुलगी दुआ पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट धरून उभी होती. हि बातमी शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या जोडप्याने सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे दुआचे स्वागत केले. तेव्हापासून, दीपिका तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन साधत आहे. दुसऱ्यांदा गरोदर राहण्यासोबतच, ती आठ तासांच्या शिफ्टची मागणी करत असल्यामुळेही चर्चेत राहिली आहे. या नंतर ती अनेक चित्रपटासाठी नकार आणि माघार घेतला आहे.
हेही वाचा
नेहा कक्कर झाली भावूक, आईच्या कष्टीची आठवण सांगताना भरून आले डोळे










