Saturday, July 11, 2026
Home बॉलीवूड ‘टॅलेंट’ नव्हे तर या गोष्टीमुळे मिळाल्या भूमिका, अंजली आनंदने वक्त केली खंत व्यक्त

‘टॅलेंट’ नव्हे तर या गोष्टीमुळे मिळाल्या भूमिका, अंजली आनंदने वक्त केली खंत व्यक्त

अंजली आनंद हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे तीला प्रसिध्दी मिळाली. पण तिने नुकतेच तिच्याबाबत एक खंत व्यक्त केली आहे. तिला अनेकदा तिच्या शरीरयष्टीमुळे चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका मिळतात, तर चित्रपट निर्मात्यांच्या हे लक्षातच येत नाही की तिच्यात अभिनयाची मोठी प्रतिभा आहे. तर सध्या ती तीच्या आगमी चित्रपट धमाल 4 साठी चर्चेत आहे. 

एका दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अंजली (anjali)आनंद म्हणाली की, तिला अभिनयाच्या बहुतेक संधी तिच्या दिसण्यामुळे मिळाल्या. “मला मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये, त्यांनी मला नेहमी आधी माझ्या शरीरयष्टीमुळे निवडले गेली आहे. मग त्यांना दिसले की मी आणखी काही करू शकते, आणि मग त्यांनी मला एक वेगळी भूमिका दिली. ‘अनटॅग’ ही माझी पहिली भूमिका होती आणि ती माझ्या शरीरयष्टीमुळेच मिळाली. नंतर, मला ‘रात जवान है’ आणि ‘डब्बा कार्टेल’मध्ये चांगल्या भूमिका मिळाल्या होत्या.

अंजलीने ‘अनटॅग’ या वेब सीरिजमधुन आपल्या करीयरची सुरुवात केली आहे. त्यानंतर तिने ‘ढाई किलो प्रेम’ या टीव्ही शो मध्ये काम केले. आणि तीला जास्त अश्या भुमिका मिळाल्या जे तिच्या वजनावर लक्ष केंद्रीत करतील आणि त्यातुन हसु निर्माण होतील. मात्र, भविष्यात गोष्टी बदलतील अशी तिला आशा आहे. आणि ती आता अंजली सध्या इंद्र कुमारच्या ‘धमाल 4’ मध्ये रितेश देशमुखसोबत काम करत आहे.

नेहा कक्कर झाली भावूक, आईच्या कष्टीची आठवण सांगताना भरून आले डोळे

हे देखील वाचा