Tuesday, February 24, 2026
Home साऊथ सिनेमा KGF स्टार यशच्या चित्रपटात कोण आहे नवी हिरोईन? 800 कोटींच्या हिटनंतर नव्या अंदाजात धमाकेदार एन्ट्री

KGF स्टार यशच्या चित्रपटात कोण आहे नवी हिरोईन? 800 कोटींच्या हिटनंतर नव्या अंदाजात धमाकेदार एन्ट्री

यशची बहुप्रतिक्षित फिल्म ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवार ६ जानेवारी २०२६ रोजी .निर्मात्यांनी अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिच्या ‘मेलिसा’ या भूमिकेचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केला  गीथू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा कन्नड अ‍ॅक्शन थ्रिलर १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी रणवीर सिंगचा ‘धुरंधर पार्ट 2’ देखील रिलीज होत असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळू शकते.

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth)मेलिसाच्या भूमिकेत आत्मविश्वासाने चालताना दिसत आहे. अरुंद आणि गर्दीच्या गल्लीतील पार्श्वभूमी, हाय स्लिट असलेला डार्क टील गाउन, हातातील क्लच आणि चेहऱ्यावरचा ठाम आत्मविश्वास—या सगळ्यामुळे तिचा लूक रहस्यमय आणि ग्लॅमरस वाटतो. पोस्टरवरूनच तिची भूमिका चित्रपटात अत्यंत मजबूत आणि महत्त्वाची असणार, याचा अंदाज येतो.

सोशल मीडियावर हा पोस्टर समोर येताच प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. “रुक्कूची धमाकेदार एंट्री” अशी कमेंट करत काही चाहत्यांनी तिच्या स्टाइल आणि स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केले आहे. अनेकांनी हा चित्रपट खास रुक्मिणी वसंतसाठी पाहणार असल्याचेही म्हटले आहे.

‘टॉक्सिक’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री कियारा अडवाणी हिनेही रुक्मिणीच्या फर्स्ट लूकचे कौतुक केले. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्टर शेअर करत, “टॉक्सिक द मूव्हीमध्ये रुक्मिणी वसंत” असे लिहिले. कियाराच्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.

‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटात यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट डार्क, स्टायलिश आणि इंटेन्स कथानक सादर करणार असल्याचे निर्माते सांगत आहेत.

रुक्मिणी वसंत हिला शेवटचे ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ब्लॉकबस्टर ‘कांतारा: ए लेजेंड – चॅप्टर 1’ मध्ये पाहण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या कनकवथी या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या सिनेमाने जगभरात ८०० कोटींहून अधिक कमाई करत २०२५ मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

रुक्मिणी वसंतने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट ‘बीरबल ट्रायलॉजी’ पासून केली. तिचे वडील कर्नल वसंत वेणुगोपाल हे भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि त्यांना अशोक चक्र या सर्वोच्च शांतिकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले.

बेंगळुरूमध्ये जन्मलेली आणि वाढलेली रुक्मिणीने सेंट जोसेफ्स कॉलेजमधून इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यानच तिचा कल थिएटर आणि परफॉर्मिंग आर्ट्सकडे वळला. रंगभूमी, शॉर्ट फिल्म्स आणि वेब प्रोजेक्ट्समधून स्वतःला घडवत तिने आज कन्नड चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
बालकलाकार म्हणून गाजलेला ‘लड्डू’ आज कसा दिसतो? २५ वर्षांनंतरचा बदल चर्चेत

हे देखील वाचा