Monday, February 23, 2026
Home बॉलीवूड शाहरुख खानचा फेवरेट अभिनेता कोण? इम्तियाज अलींसमोर केली होती भरभरून प्रशंसा, ऐकून स्वतः अभिनेता देखील झाला चकित

शाहरुख खानचा फेवरेट अभिनेता कोण? इम्तियाज अलींसमोर केली होती भरभरून प्रशंसा, ऐकून स्वतः अभिनेता देखील झाला चकित

बॉलिवूडचे बादशाह शाहरुख खान असे सुपरस्टार आहेत, ज्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर हॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किंग खानसोबत काम करून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची कारकीर्द उजळली आहे. त्यांच्या स्टारडममुळेच बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते आजही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात. मात्र, शाहरुख खानचा आवडता अभिनेता कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी एकदा याचा खुलासा केला होता. चला तर मग जाणून घेऊया, शाहरुख खानच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल.

दिग्दर्शक इम्तियाज अली त्यांच्या चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’च्या प्रमोशनसाठी दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये उपस्थित होते. याच शोदरम्यान इम्तियाज अली यांनी शाहरुख खानच्या फेवरेट स्टारचे नाव उघड केले. इम्तियाज अली यांनी सांगितले की, एकदा शाहरुख खान यांच्याशी बोलताना त्यांनी दिलजीत दोसांझची मनापासून प्रशंसा केली होती आणि त्यांना या देशातील सर्वोत्तम अभिनेता असे म्हटले होते.

इम्तियाज अली म्हणाले, “एक दिवस माझी शाहरुख खान जींसोबत चर्चा होत होती. तेव्हा त्यांनी दिलजीतचा उल्लेख केला आणि सांगितले की दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)त्यांना या देशातील बेस्ट अभिनेता वाटतो.” यासोबतच इम्तियाज अली यांनी दिलजीत दोसांझचे कौतुक करत म्हटले की, “जर दिलजीतने ‘अमर सिंह चमकीला’मध्ये काम करण्यास नकार दिला असता, तर हा चित्रपट कदाचित बनलाच नसता. कारण दिलजीत पाजींपेक्षा चांगल्या अभिनेत्याची आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो. दिलजीत आणि परिणीती – दोघेही अत्यंत गुणी कलाकार आहेत.”

काही दिवसांपूर्वी दिलजीत दोसांझ एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा शाहरुख खान यांनी आपल्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, दिलजीत म्हणाले की, इम्तियाज अली यांच्या तोंडून ही गोष्ट ऐकून ते स्वतःही आश्चर्यचकित झाले होते. कारण ते स्वतः शाहरुख खानचे खूप मोठे चाहते आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

सेन्सॉर सर्टिफिकेटच्या वादात अडकलेली थलापती विजयची ‘जना नायकन’ 9 जानेवारीला होणार नाही रिलीज, निर्मात्यांचा मोठा निर्णय

हे देखील वाचा