Tuesday, January 13, 2026
Home बॉलीवूड ‘लॉलीपॉप लागेलू’वर बेधुंद नाचले कृति सेनन आणि वरुण शर्मा; नूपुर सेनन–स्टेबिन बेनच्या संगीत समारंभातील व्हिडिओ व्हायरल

‘लॉलीपॉप लागेलू’वर बेधुंद नाचले कृति सेनन आणि वरुण शर्मा; नूपुर सेनन–स्टेबिन बेनच्या संगीत समारंभातील व्हिडिओ व्हायरल

नूपुर सेनन आणि स्टेबिन बेन यांच्या संगीत सेरेमनीतील मजेदार आणि भव्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या आनंदी सोहळ्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांना प्रचंड आवडत असून, त्यातच आता एक खास डान्स व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नूपुरच्या लग्नापूर्वी झालेल्या संगीत समारंभात बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन आणि अभिनेता वरुण शर्मा यांनी लोकप्रिय भोजपुरी गाणं ‘लॉलीपॉप लागेलू’ वर जोरदार डान्स केला आणि संपूर्ण कार्यक्रमात धमाल उडवून दिली.

नूपुर सेनन-स्टेबिन बेन यांच्या संगीत सेरेमनीमध्ये कृति सेनन आणि वरुण शर्मा (Varun Sharma)यांचा डान्स परफॉर्मन्स विशेष आकर्षण ठरला. ‘लॉलीपॉप लागेलू’ या गाण्यावर दोघांचे बेफिकीर डान्स मूव्ह्स आणि एनर्जी पाहून उपस्थित पाहुणेही थक्क झाले. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच तो काही वेळातच व्हायरल झाला. या खास प्रसंगी वरुण शर्मा काळ्या रंगाच्या डिझायनर शेरवानीमध्ये हँडसम दिसत होता, तर कृति सेनन लहंग्यामध्ये अत्यंत सुंदर आणि ग्रेसफुल दिसत होती.

संगीत समारंभातील आणखी एका व्हिडीओमध्ये नवरा-नवरी ‘गल्लां गुडियां’ या गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या क्लिपमध्ये नूपुर आणि कृति आपल्या गर्ल गँगसोबत ‘सजनजी वारी वारी’ या गाण्यावर धमाल करताना दिसतात. या सर्व व्हिडीओंमधून कार्यक्रमातील आनंदी आणि उत्साही वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे. याआधी हल्दी सेरेमनीचे व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यामध्ये कृति, नूपुर आणि स्टेबिन ढोलच्या तालावर मनसोक्त नाचताना दिसले होते.

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननची बहीण नूपुर सेनन आणि लोकप्रिय गायक स्टेबिन बेन यांच्या लग्नाचे सोहळे उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडत आहेत. हे दोघे 11 जानेवारी रोजी लेक सिटीतील रॅफल्स हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. या स्टार-स्टडेड लग्नातील प्रत्येक अपडेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

या स्टारकिडने तारा सुतारियासोबत दिले होते भरपूर इंटिमेट सीन्स, तरीही डेब्यू ठरला महाफ्लॉप; आता 2026 मध्ये चमकणार का नशीब?

हे देखील वाचा