[rank_math_breadcrumb]

५ वर्षांची झाली वामिका; मुलीच्या बर्थडेला अनुष्का शर्माची हृदयस्पर्शी पोस्ट, मातृत्वाबाबत मांडले सुंदर विचार

अनुष्का शर्मा गेल्या सात वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मुलगी वामिका आणि मुलगा अके यांच्या जन्मानंतर तिने संपूर्ण वेळ कुटुंबासाठी देण्याचा निर्णय घेतला असून, ती स्वतःला ग्लॅमर आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवताना दिसते. सध्या अनुष्का तिच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये अधिक काळ घालवत आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना आपल्या आयुष्यातील खास क्षणांची झलक दाखवत राहते.

दरम्यान, अनुष्का शर्मा (Anushka Sharma)आणि विराट कोहली यांची मुलगी वामिकाचा पाचवा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. ११ जानेवारी रोजी वामिकाच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने एक अतिशय गोड आणि हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चर्चेत आहे. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुलीसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका हातात आपल्या बाळाला धरून आहे, तर दुसऱ्या हाताने इतर गोष्टी सांभाळताना दिसते. फोटोवर “मातृत्वाला बदलू द्या” असे कॅप्शन लिहिले आहे. यासोबतच अनुष्काने लिहिले, “आणि मला त्या काळात परत जायचं नाही, जेव्हा मी तुला ओळखत नव्हते, माझ्या बाळा. ११ जानेवारी २०२१.” या पोस्टसोबत तिने दोन हृदयाचे इमोजीही जोडले आहेत.

अनुष्का शर्माने ११ जानेवारी २०२१ रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला होता. त्यावेळी तिने सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर चार वर्षांनी, अनुष्काने आपल्या दुसऱ्या मुलाला — अकेला — जन्म दिला. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अकेचा जन्म झाला असून, तो यावर्षी दोन वर्षांचा होणार आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर अनुष्का शर्मा शेवटची डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. यानंतर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काला’ या चित्रपटात ती एका गाण्यात झळकली होती.

आता चाहते अनुष्काच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिचा आगामी चित्रपट ‘चकडा एक्सप्रेस’ सात वर्षांपूर्वी जाहीर झाला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असले तरी तो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटात अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू झुलन गोस्वामी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
2025 ची महा-फ्लॉप फिल्म; 25 कोटींच्या बजेटवर बनून अवघी 1.28 कोटींची कमाई, भाऊ-बहिणीच्या जोडीला मोठा धक्का