[rank_math_breadcrumb]

मारहाण आणि छोटे कपडे घालण्यावरून एक्स गर्लफ्रेंडला रोखायचा अभिनेता; समर्थ जुरेलचे अभिषेकवर गंभीर आरोप

ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार सध्या ‘लाफ्टर शेफ्स 3’ या शोमध्ये एकत्र झळकत आहेत. तिघांच्याही नातेसंबंधांमुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत. बिग बॉसच्या घरातही त्यांच्या वादांमुळे मोठी चर्चा झाली होती. मात्र नंतर गैरसमज दूर झाले आणि ईशा, समर्थ व अभिषेक हे पुन्हा मित्र झाले. अशातच आता अभिनेता समर्थ जुरेलचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात त्याने अभिषेक कुमारवर गंभीर आरोप करत ईशासोबतच्या ब्रेकअपमागची कारणे सांगितली आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये समर्थ जुरेलने धक्कादायक खुलासे केले आहेत. तो म्हणतो,
“ईशा दीड वर्षांपासून अभिषेकपासून दूर होती. न्यू ईयरच्या दिवशी अभिषेकने तिला जोरात थप्पड मारली होती. तिचा डोळा फुटण्यापासून थोडक्यात बचाव झाला होता आणि डोळ्याला सूज आली होती.”
यानंतर समर्थने अभिषेकच्या वागणुकीवर भाष्य करत, “एक-एक करून सगळे कांड सांगणार आहे,” असेही म्हटले.

एका दिलेल्या मुलाखतीत समर्थने पुढे सांगितले की,
“पहिला प्रकार न्यू ईयरच्या दिवशी घडला. दुसऱ्या प्रसंगात, ईशाने बॅकलेस ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर त्यांच्यात मोठा वाद झाला. कार चालवत असताना अभिषेकने ‘हा फोटो लगेच काढ, नाहीतर तुला कारमधून ढकलून देईन’ अशी धमकी दिली.

समर्थने तिसरा आरोप करताना सांगितले की, अभिषेकने ईशाला (isha)शारीरिक इजा करण्याची धमकीही दिली होती.
“व्हॅनिटी व्हॅनमध्ये असताना गरम चहा दाखवत ‘तुझा चेहरा जाळीन’ अशी धमकी दिली,” असा दावा समर्थने केला.

ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांची ओळख ‘उडारियां’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. मात्र त्यांचे नाते पुढे टिकले नाही. त्यानंतर ईशा आणि समर्थ जुरेल सुमारे दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण बिग बॉस 17 नंतर त्यांचाही ब्रेकअप झाला. सध्या मात्र ईशा, समर्थ आणि अभिषेक यांच्यात सर्व काही ठीक असून ते पुन्हा मित्र असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस – पहिल्या वीकेंडवर मिळाले काही असे रिझल्ट