Wednesday, December 3, 2025
Home अन्य ‘नागिन’ फेम अनिता हसनंदानीला पाहिजेत आणखी ३ मुले; पतीकडे केली मागणी, मजेशीर व्हिडिओ व्हायरल

‘नागिन’ फेम अनिता हसनंदानीला पाहिजेत आणखी ३ मुले; पतीकडे केली मागणी, मजेशीर व्हिडिओ व्हायरल

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘नागिन’ आणि ‘ये हैं मोहबते’ फेम अनिता हसनंदानी तिच्या अभिनया सोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून खूप चर्चेत असते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पतीकडे आणखी तीन मुलांची मागणी करताना दिसत आहे.

अनिताचा पती रोहित रेड्डीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने एक एडिट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचा मुलगा आरव हा एका फ्रेममध्ये चार वेगवेगळ्या रूपात दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून रोहितने कॅप्शन दिले आहे की, “हा मुलगा एका मुठी एवढा आहे पण मी त्याच्यावर खूप प्रेम करतो.”

अनिताच्या पतीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला‌ रिपोस्ट केला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “रोहित मला आणखी असे 3 क्यूटीपूटी पाहिजे.”

या व्हिडिओबद्दल बोलायचे झाल्यास, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहितने आरवला‌ बेडवर झोपवले आहे. त्यांनतर तो थोडा वेळ बाहेर जातो. आत येऊन बघतो तर काय बेडवर एका आरव सोबत आणखी तीन आरव खेळताना दिसत आहेत. हे पाहून रोहित हैराण होतो.

रोहितने शेअर केलेला हा व्हिडिओ इतका मजेशीर आणि गोड आहे ना की, बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी देखील यावर कमेंट केली आहे. या व्हिडिओवर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने हसण्याची ईमोजी पोस्ट केला आहे आणि लिहिले की, “आधी पासून आणखी प्लॅनिंग करत आहात.” अभिनेत्री समीरा रेड्डीने हार्ट आणि हसण्याची ईमोजी पोस्ट करून लिहिले आहे की, “ओएमजी.” या सोबतच रिधिमा पंडित आणि रश्मी देसाई यांनी लाईक करून कमेंट केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा