बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर देखील आता चित्रपट सृष्टीमध्ये तिचे नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहे. जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. यांनतर ती खूप चर्चेत होती. तिचा धडक हा चित्रपट मराठीतील ‘सैराट’ या चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट हिंदीमध्ये देखील चांगला चालला होता. हिंदीमध्ये देखील या चित्रपटाच्या गाण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता जान्हवी चित्रपट सृष्टीमध्ये तिची जागा निर्माण करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने दीपिका पदुकोण बाबतीत काही असे म्हटले आहे की, जे ऐकून कोणीही अवाक् होईल.
जान्हवीच्या एका मुलाखतीत जेव्हा तिला विचारले की, कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोण या दोघींपैकी जर तिला तिची रूम शेअर करावी लागली, तर तिला कोणासोबत रूम शेअर करायला आवडेल?
या प्रश्नानंतर एका क्षणाचाही विलंब न करता तिने दीपिका पदुकोणचे नाव घेतले. ती म्हणाली की, “आम्ही दोघी रूममध्ये साऊथ इंडियन म्युझिक ऐकू शकतो. त्यामुळे मला दीपिका पदुकोणसोबत रूम शेअर करायला आवडेल.”
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबाच ती करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. यामध्ये तिच्या सोबत कार्तिक आर्यन दिसणार होता. पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. परंतु अजूनही त्याच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्याचे नाव समोर आले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…