बॉलिवूडसाठी सन २०२० पासून सुरू झालेला वाईट काळ अजूनही संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. तेव्हापासून आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अशामध्ये आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रायन स्टीफन यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. नुकतेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे.
रायन अनेक काळ करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनशी जोडले गेले होते. मागील काही दिवसात ते कियारा आडवाणी अभिनित ‘इंदू की जवानी’ आणि काजोल, नेहा धुपिया तसेच श्रुती हासन यांची शॉर्ट फिल्म ‘देवी’मुळे चर्चेत होते. रायन यांच्या निधनाची माहिती अभिनेते मनोज वाजपेयी अभिनित ‘द फॅमिली मॅन’चे लेखक, निर्माते सुपर्ण एस वर्मा यांनी दिली आहे.
Life is cruel! But you were kind! @ryanmstephen thank you for your compassion in a ruthless world. I’m glad we undertook a journey on a few stories, the joy in writing them was because of you. You leave behind so many who loved you. Cook up a storm my friend. God bless you ❤️ pic.twitter.com/rLkhqciR40
— Suparn S Varma (@Suparn) May 29, 2021
त्यांनी ट्वीट केले आहे की, “जीवन खूप क्रूर आहे. परंतु तुम्ही खूप दयाळू होता रायन स्टीफन. एक निर्दयी जगात तुमच्या करुणासाठी धन्यवाद. मला आनंद आहे की, आपण काही गोष्टींवर एकत्र काम केले. त्या लिहिण्याचा आनंद तुमच्यामुळेच होता. तुम्ही तुमच्या मागे अनेक लोक सोडले आहेत, जे तुमच्यावर प्रेम करतात. देव तुमचं भलं करो.”
It’s so so shocking for all of us who knew this gentle soul .It really can’t be true!! I will miss you my friend RYAN ❤️ https://t.co/VDDkCMH6Kb
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) May 29, 2021
सुपर्ण एस वर्मा यांचे ट्वीट रिट्विट करत मनोज वाजपेयी यांनीही रेयान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले की, “हे आम्हा सर्वांसाठी खूप हैराण करणारे आहे, जे या प्रेमळ आत्म्याला ओळखतात. हे खरंच सत्य असू शकत नाही. मला तुमची खूप आठवण येईल मित्र रायन.”
Heartbroken. One of the nicest human beings i’ve ever known ???????????? https://t.co/QZbviknDi8
— Dia Mirza (@deespeak) May 29, 2021
मनोज वाजपेयींव्यतिरिक्त दिया मिर्झानेही हे ट्वीट रिट्विट करत रायन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…