[rank_math_breadcrumb]

मर्दानी 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 1: पहिल्याच दिवशी राणी मुखर्जीची जादू? चित्रपटाला भरभरून दाद, इतक्या कोटींची झाली कमाई

राणी मुखर्जीची बहुचर्चित फिल्म ‘मर्दानी 3’ चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली असून तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र बहुतांश प्रेक्षकांना हा चित्रपट प्रभावी वाटत असून, शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणीला पुन्हा पाहून चाहते आनंदी झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली एस्टिमेटनुसार हा आकडा असून, अंतिम आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईत सर्वाधिक प्रभाव – ‘मर्दानी 3’चे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले आहे. चित्रपटाची कथा आयुष गुप्ते, दीपक किंगराणी आणि बलजीत सिंह मारवा यांनी लिहिली आहे. राणी मुखर्जींसोबत जानकी बोडीवाला आणि मलायका प्रसाद (Mallika Prasad)महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. अपेक्षेपेक्षा थोडे कमी ओपनिंग असले तरी, शहरांमध्ये मुंबईत चित्रपटाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे.

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार,

  • सकाळच्या शोची ऑक्युपन्सी: 8.97%

  • दुपारच्या शोची ऑक्युपन्सी: 14.78%

  • संध्याकाळच्या शोची ऑक्युपन्सी: 17.13%

शहरनिहाय पाहता,

  • मुंबई: 19.50% (सर्वाधिक)

  • लखनऊ: 17.33%

  • सूरत: 4.67% (सर्वात कमी)

चित्रपटाची कथा काय आहे? चित्रपटाची कथा एका हाय-प्रोफाइल व्हीआयपीच्या मुलीच्या आणि तिच्या घरात काम करणाऱ्या नोकराणीच्या मुलीच्या अपहरणापासून सुरू होते. राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या कणखर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतात. महिलांच्या ड्रग्ससाठी होणाऱ्या तस्करीच्या प्रकरणातून तपास सुरू होतो आणि शिवानी ‘मुलीला वाचवा’ या केसचा तपास स्वतःकडे घेते.

तपासादरम्यान ती एका भयावह कटात अडकते. एकामागोमाग एक गुन्हे उघडकीस येतात आणि या सर्व प्रकरणांचा धागा अम्मा (मलायका प्रसाद) या खलनायिकेपर्यंत पोहोचतो. सत्याच्या अधिक जवळ जात असतानाच, प्रकरण दिसते त्यापेक्षा कितीतरी गंभीर असल्याचे शिवानीच्या लक्षात येते. विश्वासघात, सत्तेचा गैरवापर आणि दडपून ठेवलेल्या कटू सत्यांचा उलगडा हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

गोळी झाडून घेतलेले सीजे रॉय कोण होते? मोहनलाल यांच्या चित्रपटांचे होते निर्माते