दर आठवड्याला बॉक्स ऑफिसवर नवे चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र, या शुक्रवारी तब्बल 687 कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेली एक डॉक्युमेंट्री फिल्म प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत खेचण्यात अपयशी ठरली. ही डॉक्युमेंट्री आहे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यावर आधारित ‘मेलानिया: 20 डेज टू हिस्ट्री’. ओपनिंगला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी चित्रपट समीक्षकांनी या डॉक्युमेंट्रीवर टीकेची झोड उठवली आहे.
ब्रेट रॅटनर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ही डॉक्युमेंट्री डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्या दुसऱ्या राष्ट्रपती शपथविधीच्या 20 दिवस आधीच्या काळावर आधारित आहे. सिन्हुआच्या अहवालानुसार, पहिल्या दिवशी ट्रम्प समर्थकांकडून या डॉक्युमेंट्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि 7 मिलियन अमेरिकी डॉलरची कमाई झाली. डॉक्युमेंट्रीसाठी ही कमाई मोठी मानली जाते, मात्र त्यानंतर प्रेक्षकांचा ओघ घटत गेला.
मेलानिया ट्रम्प या डॉक्युमेंट्रीच्या को-प्रोड्यूसरही आहेत आणि ट्रम्प स्वतः या चित्रपटाचा जोरदार प्रचार करताना दिसले. मेलानियांनी तर “माझी गोष्ट प्रत्येकाला जाणून घ्यायची आहे” असा दावाही केला होता. मात्र, लंडन प्रीमियरमध्ये वास्तव वेगळेच दिसून आले. लंडनच्या इस्लिंग्टन येथील एका सिनेमागृहात दिवसा केवळ एकच तिकीट विकले गेले, तर संध्याकाळच्या शोसाठी फक्त दोन तिकीट विकली गेली.
ब्रिटनमधील प्रसिद्ध कॉलमनिस्ट आणि फिल्म क्रिटिक जुडिथ वुड्स यांनी नॉर्थ लंडनमधील मॉलमध्ये ही डॉक्युमेंट्री पाहिली. त्यांनी सांगितले की, संपूर्ण थिएटरमध्ये केवळ पाच प्रेक्षक होते, ज्यापैकी एक महिला फक्त थंडीपासून बचाव करण्यासाठी सिनेमागृहात आली होती.
ही गेल्या 12 वर्षांतील ब्रेट रॅटनर यांची पहिली फीचर फिल्म आहे. मागील काही वर्षांपासून ते विविध वादांमध्ये अडकले होते. त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाले होते, मात्र रॅटनर यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला दाखल झालेला नाही. जवळपास दशकभरानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे.
ही डॉक्युमेंट्री अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओजने हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या डॉक्युमेंट्रीत 2025 मधील ट्रम्प यांच्या दुसऱ्या शपथविधीपूर्वीचे 20 दिवस, शपथविधीची तयारी, व्हाइट हाऊस ट्रान्झिशन, कुटुंबाला वॉशिंग्टनला परत आणण्याची प्रक्रिया, तसेच अनएक्सप्लोर्ड फुटेज, खासगी बैठक आणि संवाद दाखवण्यात आले आहेत, ज्यातून मेलानियांची फर्स्ट लेडी म्हणूनची भूमिका उलगडते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
The 50: ‘द लायन’समोर भर सभेत या स्पर्धकाने शो सोडण्याची केली घोषणा?










