‘मर्डर’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने आणि बोल्डनेसने सर्वांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. मर्डर चित्रपटातील तिच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. ती आधीपासूनच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला वेगवेगळी पात्रं निभावली आहेत. मल्लिका शेरावत ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती प्रत्येक दिवशी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकताच पाण्यातील बोल्ड अंदाजातील एक व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
मल्लिका शेरावतने तिच्या करिअरमध्ये सर्वात मोठा आणि सर्वात छोटा अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे. तिने आता स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मल्लिकाने इंस्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो रात्री शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. या सोबतच तिने केसांमध्ये गुलाबी रंगाचे फूल लावले आहे. ती पाण्यात हॉट अंदाजात दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तिचे चाहते या फोटोवर त्यांची प्रतिक्रिया देखील देत आहेत.
मल्लिकाने तिच्या करिअरची सुरुवात टीव्हीवरील जाहिरातींमधून केली होती. यांनतर ती ‘जीना सिर्फ मेरे लिये’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसली होती. तिने ‘ख्वाहिश’, ‘मर्डर’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटात काम केले. यांनतर तिला खरी ओळख मिळाली.
नुकतेच तिने सांगितले की, मर्डर या चित्रपटात बोल्ड सीन दिल्यामुळे लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. तिने सांगितले की, तेव्हाचे तिचे सीन आताच्या चित्रपटाच्या तुलनेने काहीच नव्हते. पण आता लोकांचे विचार बदलले आहेत.
एकदा ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये इमरान हाश्मीने सांगितले होते की, मल्लिका चांगली किसर नाहीये. याला उत्तर देताना तिने सांगितले होते की, सापाला किस केले होते, तेव्हा देखील इमरान हाश्मीपेक्षा चांगला किस केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










