[rank_math_breadcrumb]

बाप रे ! राखी सावंत पुन्हा चढणार बोहल्यावर? अभिनेत्रीचा व्हिडीओ आला समोर

अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे आणि पोशाखांमुळे चर्चेत असते. नुकतेच राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राखी नवरीच्या पोशाखात दिसत आहे. तसेच राखी आता पुन्हा लग्न करणार आहे. असे देखील तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इतक्या वेळा प्रेमात धोका खाल्यानंतर देखील राखी कसे काय परत लग्न करत आहे? असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे.

नुकतेच राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात राखी सावंत खूपच सुंदर कपडे घातलेली दिसतेय. तिने सोनेरी, भरीव भरतकाम केलेली साडी परिधान केलेली दिसतेय. तिच्या केशरचनाने सर्वात जास्त लक्ष वेधले आहे. तिने गुलाबाच्या रंगांचा वापर करून तिच्या केसांमध्ये हृदयाच्या आकाराची रचना तयार केली आहे. राखी माळ धरून पापाराझींना म्हणत आहे, “आज मी एक पूर्णपणे विदेशी वधू आहे.”

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये राखी सावंत पॅपराझींबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. ती विचारते, “मी मंजुलिकासारखी दिसते का? ‘तुझी आई मंजुलिका आहे.'” राखीच्या या व्हिडिओवर नेटिझन्सकडून मनोरंजक कमेंट्स आल्या आहेत. युजर्स लिहित आहेत, “ती फुलदाणीसारखी दिसते.” एका युजरने लिहिले, “तिला ‘द ५०’ शोमध्ये का घेतले नाही?”

राखी सावंतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिचे दोनदा लग्न झाले होते. परंतु, तिचे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत. आदिल खान दुर्राणीशी तिचे लग्न खूप चर्चेत होते. त्यांच्या नात्यात बिघाड झाला आणि २०२३ मध्ये ते वेगळे झाले. राखीने आदिलवर घरगुती हिंसाचारासह अनेक आरोप केले होते. त्यानंतर आदिलला अटक करण्यात आली. सुमारे पाच महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याची सुटका झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

गोविंदाला कोण मारू पाहत आहे? मॅनेजरचा मध्यरात्रीच्या हल्ल्याचा धक्कादायक खुलासा