Tuesday, February 10, 2026
Home बॉलीवूड बिग बॉस मराठी ६: नागिन बनून आलेल्या राखी सावंतच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने ‘बिग बॉस मराठी ६’ चे वातावरण बदले

बिग बॉस मराठी ६: नागिन बनून आलेल्या राखी सावंतच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने ‘बिग बॉस मराठी ६’ चे वातावरण बदले

बिग बॉस मराठी सहा चांगलाच गाजत आहे तर बिग बॉस मराठीच्या घरात नुकतंच दिव्य शिंदे आणि ओंकार हे बाहेर गेल्यानंतर, घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. ती व्यक्ती म्हणजे नेहमी मनोरंजन आणि ड्रामा करण्यामध्ये प्रथम म्हणले तरी हरकत नाही. ती आहे गेम प्लेसाठी ओळखले जाणारी राखी सावंत आणि हिची बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये एन्ट्री झाली आहे. या शोमध्ये दोन किंवा अधिक वाईल्ड कार्ड स्पर्धक आहेत आणि आता, राखीच्या आगमनाने, आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री देखील लवकरच येऊ शकते अशी शक्यता आहे.

राखी सावंतने बिग बॉस मराठी ६ च्या घरात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. आणि ती तिच्या बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. पहिल्या दिवसापासूनच मजेदार कामगिरी करेन, असे अनेकदा बातम्यांमध्ये असलेली राखी खेळात खळबळ उडवून देईल अशी अपेक्षा आहे.घरातील कोणा कोणाला आव्हान देते , हे पाहणे गरजेचे आहे. तिच्या स्वतःच्या अटींवर खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतच्या प्रवेशामुळे घरातील करमणुक वाढेल अशी अपेक्षा आहे.

राखी सावंतला (Rakhi Sawant)वाटते बिग बॉस तिच्याशिवाय अपूर्ण आहे. ती पूर्ण मनोरंजन, उत्कृष्ट रणनीती, अद्वितीय पोशाख आणि निर्भय गेमप्लेचे आश्वासन देते.बिग बॉस प्लॅटफॉर्म मौल्यवान आहे. शो व्यतिरिक्त, राखीने होस्ट रितेश देशमुखचेही कौतुक केले, त्याला एक हुशार अभिनेता म्हटले आहे.तिने स्पष्ट केले की बिग बॉस मराठीमध्ये तिचा सहभाग मराठी प्रेक्षकांसाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

‘ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे…’ रूपाली गांगुली यांनी आरएसएसच्या कार्यक्रमात लावली हजेरी

हे देखील वाचा