[rank_math_breadcrumb]

या अभिनेत्याला पदार्पणकरताच अपयश आले, सात वर्षाचा ब्रेक घेऊन पुन्हा उत्कृष्ट कामगिरी करत केले पुनरागमन

फहाद फासिल यांनी लहान वयातच मनोरंजन जगात प्रवेश केला. पहिल्यांदा चित्रपट करताना अपयश आले मात्र त्यांनी हार मानली नाही. नंतर स्वतःवर काम करण्यासाठी काही काळ अभिनयापासून दूर राहिले आणि काही वर्षांनी जोरदार पुनरागमन केले. आता त्याला दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट अभिनेत्या पैकी एक मानले जाते. पुष्पा २ मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे त्याला जगभरात प्रचंड ओळख मिळवून दिली आहे.

फहाद (Fahadh)चे वडिल हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. त्याने वयाच्या २० व्या वर्षी त्याच्या वडिलांच्या रोमँटिक चित्रपट “कैयेथुम दूरथ” (२००२) द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फहादला इंडस्ट्रीपासून सात वर्षांचा ब्रेक घेतला. त्यामुळे त्या दरम्यान तो आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या अभिनय कौशल्ये सुधारण्यासाठी युनायटेड स्टेट्सला गेला. 2009 मध्ये तो केरळ कॅफे या मल्याळम अँथॉलॉजी चित्रपटासह परतला.  हा प्रकल्प त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला, ज्यामुळे फहद फासिलला नवी आशा मिळाली.

फासिलच्या चित्रपटांमध्ये “चप्पा कुरीशु, अकम, 22 फिमेल कोट्टायम, डायमंड नेकलेस, अन्नयुम रसूलम, नॉर्थ 24 कथाम, आणि बंगलोर डेज यांचा समावेश होता, त्यापैकी काही बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. क्राइम ड्रामा “थोंडिमुथलम ड्रिकसाक्षियुम” (2017) त्याच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरला आणि त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

फासिलने कमल हासन, विजय सेतुपती, अल्लू अर्जुन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, नयनथारा, शिवकार्तिकेयन यांच्यासह अनेक स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात, फहादने त्याच्या २०२४ च्या एक्शन-कॉमेडी “आवेशम” चा सिक्वेल बनवण्याची घोषणा केली, ज्यामध्ये तो पुन्हा एकदा गँगस्टर रंगाची भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

बिग बॉस मराठी ६: नागिन बनून आलेल्या राखी सावंतच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने ‘बिग बॉस मराठी ६’ चे वातावरण बदले