Wednesday, February 11, 2026
Home बॉलीवूड ह्या अभिनेत्याने मित्रांकडून पैसे उधार घेऊन बनवला चित्रपट , फ्लॉप चित्रपटासाठीही जिंकला राष्ट्रीय पुरस्कार

ह्या अभिनेत्याने मित्रांकडून पैसे उधार घेऊन बनवला चित्रपट , फ्लॉप चित्रपटासाठीही जिंकला राष्ट्रीय पुरस्कार

रजत कपूर हे एक बॉलीवूड अभिनेता आहेत तर यांचा आज वाढदिवस आहे,  रजत कपूर यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1961 मध्ये दिल्ली येथे झाला. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या रजत कपूर यांनी १९८९ मध्ये कुमार शहानी यांच्या ख्याल गाथा या चित्रपटातून पदार्पण केले. सुरुवातीस त्यांना अभिनयाच्या संधी मिळत नव्हत्या तेव्हा त्यांनी लघुपट लेखन आणि दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली होती. दिग्दर्शनात पदार्पण १९९७ साली प्रायव्हेट डिटेक्टिव्ह: टू प्लस टू प्लस वन या चित्रपटासाठी केले. ज्यामध्ये इरफान खान आणि नसीरुद्दीन शाह यांनी छोट्या भूमिका केल्या होत्या.

रजत कपूर (Rajat Kapoor)यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. एकदा मित्रांकडून कर्ज घेऊन रघु रोमियो , हा चित्रपट बनवला होता. तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी, नंतर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याने त्याची कामात सर्जनशील ठेवली. रजतला त्याच्या मित्रांचे कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षे लागली मात्र, हा चित्रपट रजतच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता. रजत कपूर अजूनही अभिनय आणि अर्थपूर्ण चित्रपटाचा मास्टर मानला जातो. तो त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. बॉलीवूडचा राष्ट्रीय पुरस्कार विजेयी अभिनेता व एक बहुमुखी अभिनेता आणि दिग्दर्शक दोन्ही तो आहे.

रजत कपूरला मीरा नायरच्या “मान्सून वेडिंग” या चित्रपटाने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली, ज्यामध्ये त्याने एका काकाची भूमिका केली. शिवाय, त्याने अनेक चित्रपटांमध्ये लेखन, दिग्दर्शन आणि काम केले आहे. २००७ मध्ये, त्याने यूके टेलिव्हिजन चित्रपट “द लास्ट डेज ऑफ द राज” मध्ये मुहम्मद अली जिना यांची भूमिका केली.  २००८ मध्ये त्यांनी स्लीपर हिट मिथ्या दिग्दर्शित केले आणि २०१० मध्ये त्यांनी बंगाली चित्रपट लेखिका अपर्णा सेन दिग्दर्शित ‘इति मृणालिनी’ या बंगाली चित्रपटात कोंकणा सेनसोबत काम केले. २०२२ मध्ये ते दृश्यम २ मध्ये दिसले. रजत कपूर शेवटचे २०२५ मध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या हॉरर वेब सीरिज ‘खौफ’ मध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा  

अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी ४२ नियमांची आवश्यकता आहे का, ज्यामध्ये डोळ्यांच्या संपर्कावर बंदी आहे का? या अफवांवर आता सुपरस्टार संतापला

हे देखील वाचा