शाहिद कपूर हा बॉलीवूडचा प्रसिद्ध हिरो आहे, आणि त्याचा आता आगामी चित्रपट ओ’रोमियो येतोय. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार असुन यांचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज आहेत. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी व्यतिरिक्त, या रोमँटिक ड्रामामध्ये नाना पाटेकर, दिशा पटानी, अविनाश तिवारी आणि फरीदा जलाल सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत, ज्यात तमन्ना भाटिया आणि विक्रांत मेस्सी यांचे विशेष कॅमिओ आहेत. चाहत्यानी चित्रपटाची एडव्हान्स बुकिंग केली आहे. तर चला जाणून घेऊया की एडव्हान्स बुकिंगची कमाई किती आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, “ओ’रोमियो” ने एडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त कमाई केली आहे, रिलीजपूर्वीच त्याने ₹1.42 कोटी, कमावले आहेत. ओ’रोमियोने अखिल भारतीय एडव्हान्स बुकिंगमधून ₹36.69 लाख कमावले आहेत, 3,449 शोसाठी अंदाजे 16,226 तिकिटे विकली गेली आहेत. ब्लॉक सीट्ससह, चित्रपटाने आज, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत 1.42कोटी कमावले आहेत.
ओ’रोमियो या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद कपूर (Shahid kapoor)आणि विशाल भारद्वाज यांनी पुन्हा एकत्र येऊन काम केले आहे यापूर्वी, त्यांनी “कमीने,” “रंगून,” आणि “हैदर” सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि आता ते “ओ’रोमियो” द्वारे धमाल करण्यास सज्ज आहेत. चित्रपटात शाहिद कपूर पहिल्यांदाच तृप्ती डिमरीसोबत काम करत आहे आणि गाण्यांमधील त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या फक्त एक दिवस ओ’रोमियो हा चित्रपट शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील चार गाणी आतापर्यंत प्रदर्शित झाली आहेत, ज्यात “हम तो तेरे ही लिए थे,” “आशिकॉं की कॉलनी,” “इश्क का फिव्हर,” आणि “पान की दुकान” यांचा समावेश आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी हा चित्रपट निर्मित केला आहे. ओ’रोमियो बॉक्स ऑफिसवर गौरव आदर्श आणि शनाया कपूर यांच्या सर्व्हायव्हल थ्रिलर “तू या मैं” सोबत स्पर्धा करेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
दृश्यम 3: चित्रपटात एक नवीन कलाकाराची एन्ट्री, ज्याने यापूर्वी अजय देवगणसोबत केले आहे काम


