Wednesday, February 11, 2026
Home बॉलीवूड सुबेदार टीझर: दमदार एक्शन आणि धमाल लूक, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षी बनले ‘सुबेदार’

सुबेदार टीझर: दमदार एक्शन आणि धमाल लूक, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षी बनले ‘सुबेदार’

अनिल कपूर हे बॉलीवूड अभिनेते आहे जे आजही लोकप्रिय आहेत. अनिल कपूर हे  हिंदी चित्रपटामध्ये सक्रिय असतात प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात अनिल कपूर यांच्या पुढील चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर सूबेदार या नावाचा ॲक्शन चित्रपट येणार आहे आणि 11 फेब्रुवारी 2016 रोजी याचा टीचर रिलीज झाला आहे. अनिल कपूर अर्जुन मौर्य या निवृत्त सैनिकाची भूमिका साकारत आहेत, ज्याचे आयुष्य त्याच्या कुटुंबातील काही त्रासदायक समस्यांमुळे विचित्र वळण घेते.

11 फेब्रुवारी २०२६ रोजी, सुबेदार चा टीझर निर्मात्यांनी दुपारी 12:30 वाजता रिलीज केला आहे. प्राइम व्हिडिओने “सुबेदार” चा अधिकृत टीझर शेअर केला आहे. व लिहिले आहे की, त्यांनी चुकीच्या माणसाशी खेळ केला! सुबेदार… , या चित्रपटासाठी प्रेक्षकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.कारण निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ५ मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.

सुबेदार हा चित्रपट सुरेश त्रिवेणी आणि प्रज्वल चंद्रशेखर यांनी लिहिला आहे, प्रेक्षकांना तो हिंदी, तमिळ आणि तेलुगूसह अनेक भाषांमध्ये पाहता येईल. अनिल कपूर अभिनीत “सुबेदार” हा चित्रपट एक अ‍ॅक्शन-थ्रिलर असणार आहे, ज्याची झलक टीझरमध्ये दिसून येते. हा टीझर 5 मार्च 2026 पासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्कच्या सहकार्याने ‘अन ओपनिंग इमेज फिल्म्स प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी निर्मित केला आहे.

आगामी चित्रपटात अनिल कपूरसोबत (Anil Kapoor)राधिका मदन देखील त्यांच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्याशिवाय, सौरभ शुक्ला, मोना सिंग, फैसल मलिक आणि आदित्य रावल हे कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. अनिल कपूर यांच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘सुभेदार’ चा टीझर 11 फेब्रुवारी 2026 रोजी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. अनिल कपूर यांचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. अनेकांनी त्यांचा उत्साह व्यक्त करत कमेंट केल्या आणि टीझरचे कौतुकही केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कोहरा २ रिलीज; बरुण सोबती आणि मोना सिंग हत्येचे गूढ उकलतील, OOT वर कोहरा 2 चा सीझन लवकरच प्रदर्शित 

हे देखील वाचा