Friday, February 13, 2026
Home बॉलीवूड ‘ओ रोमियो’च्या आधी विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूरचा हा चित्रपट पहा, कंगना राणौतने साकारली होती ही भूमिका

‘ओ रोमियो’च्या आधी विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूरचा  हा चित्रपट पहा, कंगना राणौतने साकारली होती ही भूमिका

शाहिद कपूर हा एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता असून, त्याचा ओ रोमिओ चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. तर शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांनी मिळून केलेला हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहिद कपूर सोबत प्रमुख भूमिकेत तृप्ती डिमरी देखील असणार आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी यापूर्वी तीन चित्रपट बनवले त्यापैकी दोन चित्रपटांना समीक्षकादडुन प्रशंसा मिळाली. मात्र एक चित्रपट असा आहे, ज्याचे IMDB रेटिंग लाजिरवाणे आहे. या चित्रपटात कंगना राणौत आणि सैफ अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. रंगून नावाचा हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला.

शाहिद कपूर आणि कंगना राणौत (Kangana Ranaut)यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, आणि सैफ अली खाननेही दमदार भूमिका साकारली होती. रिलीज होताच, चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, बहुतेक लोकांनी कथेला पूर्णपणे नकार दिला. बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला. 61कोटी बजेटमध्ये बनवलेला, त्याने फक्त 28 कोटी कमाई केली. जगभरात त्याची कमाई 40 कोटींच्या जवळपास होती. हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला.

पण चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे काही लोकांना रोमँटिक लव ट्रायंगल कथेची संकल्पना आवडली. मात्र, बहुतेकांना ही कथा कमकुवत आणि खराब सादरीकरण वाटली. चित्रपटाला IMDb वर देखील खूप खराब रेटिंग मिळाले. लोकांनी रंगूनला 5.6 रेटिंग दिले, जे खूपच कमी मानले जाते. ही कथा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी सबरीना धवन आणि मॅथ्यू रॉबिन्ससह लिहिली होती. संगीत स्वतः विशाल भारद्वाज यांनी दिले होते आणि गीते गुलजार यांनी लिहिली होती.

शाहिद कपूर आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आता चौथ्यांदा एकत्र काम केले आहे. ओ रोमियो हा त्यांचा एकत्र काम करण्याचा चौथा चित्रपट होता. विशालने यापूर्वी शाहिदला २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हैदरमध्ये कास्ट केले होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये रंगूनमध्ये एकत्र काम केले होते. विशाल भारद्वाज यांनी यापूर्वी 2009 मध्ये कमिने चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता, त्यांचा “ओ रोमियो” हा चित्रपट 13फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

तापसी पन्नूचा अस्सी हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी होणार प्रदर्शित, इंस्टाग्रामवर चित्रपटाची शेअर केली झलक

हे देखील वाचा