Saturday, February 14, 2026
Home बॉलीवूड प्लेबॅक सिंगिंग सोडून शिवभक्तीत रमले अरिजित सिंग, शिवरात्रीपूर्वी एक नवीन गाणे केले रिलीज

प्लेबॅक सिंगिंग सोडून शिवभक्तीत रमले अरिजित सिंग, शिवरात्रीपूर्वी एक नवीन गाणे केले रिलीज

अरिजीत सिंग हे एक लोकप्रिय गायक आहेत. पण काही दिवसांपूर्वी अरिजीत सिंगने सोशल मीडिया पोस्टकरत प्लेबॅक गायनातून निवृत्तीची घोषणा केली. 27 जानेवारी रोजी अरिजीत सिंगने त्यांच्या घोषणेने संपूर्ण देशाला धक्का होते. परंतु गायकाने हे स्पष्ट केले की तो फक्त प्लेबॅक गायनातून निवृत्त होत आहे, महाशिवरात्री 2026 च्या आधी, अरिजीत सिंगने प्लेबॅक गायनातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांचे पहिले गाणे रिलीज केले आहे. अरिजीत सिंगचे हे गाणे त्यांची आध्यात्मिक बाजू दाखवते आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे, कोणत्याही प्रमोशनशिवायही, त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

महाशिवरात्रीच्या आधी, अरिजीत सिंगने (Arijit Singh)त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर “ओ शिव मेरे” नावाचे शिव भजन रिलीज केले, ज्याचे बोल गीतकार कुमार यांनी लिहिले आहेत. युट्यूबवर रिलीज झाल्यापासून या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कुमारने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “या गाण्याला त्यांचा सुंदर आवाज दिल्याबद्दल अरिजीत सिंग यांचे खूप खूप आभार.” माणले आहेत. तर अरिजीत सिंगचे चाहतेही त्यांची प्रशंसा करत आहेत.

“ओ शिव मेरे” या गाण्याच्या रिलीजनंतर, त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. एकाने कमेंट केली की, “अरिजीतचा आवाज खरोखरच एक अनोखा प्रभाव सोडतो. या गाण्यात प्रतिबिंबित होणारी अध्यात्म आपल्या कल्पनेपलीकडे आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “अरिजीत भजन गातोय? तो त्याच्या जुन्या शैलीत परतला आहे.” मी खूप आनंदी आहे.” इतर अनेक वापरकर्त्यांनीही गाण्यावर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. गाण्याचे संगीत मनदीप पंघाल यांनी दिले आहे आणि कोरसमध्ये पियुष रंजन, सोनम पाठक, साक्षी होळकर आणि मनदीप पंघाल यांचे आवाज आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

सनी देओलच्या ‘लाहौर 1947’ या चित्रपटाचे नाव बदलले जाईल का? १५ ऑगस्टपूर्वी होणार रिलीज

हे देखील वाचा