Thursday, February 19, 2026
Home टेलिव्हिजन “द 50” चा ग्रँड फिनाले कधी? 20 स्पर्धकांमध्ये होणार जबरदस्त टक्कर

“द 50” चा ग्रँड फिनाले कधी? 20 स्पर्धकांमध्ये होणार जबरदस्त टक्कर

या वर्षीपासून टेलिव्हिजन मध्ये एक नवीन शो आला आहे तो म्हणजे “द 50”. आणि हा शो अलिकडच्या काळात चर्चेत आहे. आणि यातून काही स्पर्धेक जे बाहेर आहेत ते आपल्याला कार्यक्रमांमध्ये आणि बातम्यांमध्ये नेहमीच दिसत असतात. तर हा शो आता त्याच्या अंतिम फेरीच्या जवळ आला आहे. “द 50” चा प्रीमियर 1 फेब्रुवारी 2026 रोजी कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर झाला होता.

“द 50” हा सर्वात चर्चेत  ओटीटीवर असलेल्या  रियालिटी शो पैकी एक आहे. चित्रीकरण संपल्यानंतरही त्याचे प्रसारण वेळापत्रक चालू राहिले, परंतु आता मीडियावर रिपोर्टनुसार  नवीन बातमी समोर आली आहे. की , “द 50” चा अंतिम कार्यक्रम 19 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. पण निर्मात्यांनी अद्याप “द 50” च्या ग्रँड फिनालेची तारीख निश्चित केलेली नाही मीडिया  वृत्तानुसार एक स्पर्धक हा किताब जिंकेल आणि चाहते विजेत्याचा ट्रॉफी कोणाला मिळेल याबद्दल उत्सुक आहेत. तर “द 50” च्या अंतिम 20 स्पर्धकांमधून विजेत्याची निवड केली जाईल.,एक स्पर्धक हा किताब जिंकेल आहे. विजेत्याचा ट्रॉफी कोणाला मिळेल हे पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत.

निर्मात्यांनी अद्याप ‘द 50’ (The 50)च्या ग्रँड फिनालेची तारीख निश्चित केलेली नाही. एका प्रकाशनाने वृत्त दिले आहे की निर्मात्यांनी सुमारे 50 दिवसांसाठी द 50 शो चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, फिल्म विंडोजच्या अलिकडच्या अहवालात असे म्हटले आहे की ग्रँड फिनाले 19 फेब्रुवारी 2026 रोजी होईल. मात्र, अहवालात असेही म्हटले आहे की फिनाले त्या दिवशी प्रसारित होईल की फक्त चित्रित केले जाईल हे स्पष्ट नाही.

“द 50” मधील सपना चौधरी ही एक दमदार स्पर्धकांपैकी एक होती पण एका टास्क दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाल्यामुळे द 50 सोडल्याचे वृत्त आहे. मिडिया वृत्तानुसार 18 स्पर्धक च्या द 50 फायनलमध्ये पोहोचले. पण काही वृत्तानुसार, शोमधील अंतिम स्पर्धकांची संख्या 20 आहे. तर या मध्ये युविका चौधरी, रजत दलाल, सिवेत तोमर, लवकेश कटारिया, मनीषा राणी, शिव ठाकरे, उर्रुषी चक्के, ए. अर्चना गौतम, कृष्णा श्रॉफ, वंशराज सिंग, मिस्टर फैसू, विक्रांत सिंग, काका, लक्ष्य, हमीद बर्कजी, नेहा चुडासामा आणि सिद्धार्थ भारद्वाज हे स्पर्धक आहेत

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

तुरुंगात स्मोकिंग रूम असायला पाहिजे; राजपाल यादव यांनी केले आवाहन

हे देखील वाचा