मासूम शर्मा हे एक गायक आहेत. आणि ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. जिंद मधील सफिदो रोडवरील दीप पॅलेस येथे आयोजित एका खाजगी कार्यक्रमादरम्यान त्यांनी माजी सरपंच आणि स्टेजवर उपस्थित असलेल्या त्यांच्या समर्थकांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनत गेली. मग नंतर हाणामारी झाली. तर आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
18 फेब्रुवारीच्या रात्री गायकाची बहीण कविता शर्मा आणि मेहुणे धरमवीर यांच्या 25 व्या लग्नाच्या वर्धापन दिना निमित्त रौप्यमहोत्सवी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक गावातील अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. रात्री 11:30 वाजता सुमारे 400 लोकांच्या उपस्थितीत हा वाद सुरू झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, जेव्हा मासूम शर्मा त्यांच्या सादरीकरणासाठी स्टेजवर आले तेव्हा माजी सरपंच राजेंद्र शर्मा आणि तेथे आधीच बसलेल्या काही तरुणांना पाहून त्यांना राग आला. त्यांनी मायक्रोफोनवर घोषणा केली की त्यांच्या गाण्याच्या वेळी कोणत्याही सरपंच, आमदार किंवा मंत्र्यांना स्टेजवर परवानगी दिली जाणार नाही आणि सर्वांनी बसून कार्यक्रम पाहावा. गायकाने स्पष्टपणे सांगितले की, “जर तुम्हाला पहायचा असेल तर खाली बसून पहा, नाहीतर निघून जा.” त्यानंतर त्यांनी त्यांचे गाणे सुरू केले, “बोल तेरे मीठे मीठे बोल, बात तेरी सच्ची लगाये सई.
स्टेजवरून बाहेर पडण्यास सांगितले असता माजी सरपंच आणि त्यांचे समर्थक संतप्त झाले. काही तरुण आणि बाउन्सरमध्ये वाद आणि हाणामारी झाली. परिस्थिती बिकट होत असताना, कार्यक्रम मध्यभागी थांबवावा लागला. असे वृत्त आहे की मासूम शर्मा (Masoom Sharma)फक्त एक गाणे गाऊ शकले होते. मासूम येण्यापूर्वी इतर कलाकार सादरीकरण करत होते. माजी सरपंच आणि काही तरुण स्टेजवर बसले होते. मासूम येताच त्यांना खाली उतरण्यास सांगण्यात आले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. पोलिस स्टेशन मध्ये सध्या या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, परंतु या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










