यश हा कन्नड सुपरस्टार अभिनेता म्हणून चित्रपट सुष्टित लोकप्रिय आहे. आणि तो टॉक्सिक या चित्रपटा तो चर्चेत आहे, तर “टॉक्सिक” चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. आणि चाहते टीझर पाहून त्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे, गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. आणि हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात थ्रिलर, एक्शन, रक्तपात, बदला आणि रोमान्स दाखवण्यात आला आहे. तसेच हा गँगस्टर फिक्शन चित्रपट गोव्याच्या ड्रग्ज जगाची झलक दाखवतो.
“यावेळी युद्ध वेगळे आहे, त्यांची धूर्तताही वेगळी आहे, त्यांना टोमणे मारणे खूप जास्त होईल, तुमचा हट्टीपणा सोडून द्या, राया सोडून द्या, असे संवाद त्यात आहेत.” त्यानंतर यश एक शानदार एन्ट्री करतो, जकूझीमध्ये बसून म्हणतो, “मी संपलो म्हटल्यावर संपले.” त्यानंतर टीझरमध्ये कॅसिनो, रक्त,दारूचे दृश्ये दाखवण्यात आली आहेत आणि शेवटी, एक माणूस आरीने आपली मान कापत आहे. टीझरचा शेवट राया उर्फ यशच्या “आय एम होम डॅडी” या संवादाने होतो.
टॉक्सिक (Toxic)हा चित्रपट गोव्याच्या सुंदर पण धोकादायक किनाऱ्यावरची कथा आहे, जिथे शांतता अनेकदा रक्तपात आणि सत्ता संघर्षांनी व्यापलेली असते. चित्रपटाच्या मध्यभागी एक नायक आहे जो वारशाच्या आधारावर नव्हे तर त्याच्या इच्छाशक्ती आणि ताकदीवर आपले साम्राज्य उभारतो. या कथेत तस्करीचे मार्ग युद्ध भूमीत कसे बदलतात आणि निष्ठेची जागा संशय आणि विश्वासघात कसा घेतात हे दाखवले आहे. हा चित्रपट केवळ एक्शन पुरता मर्यादित नाही, तर एका खोल मानसिक संघर्षाचाही शोध घेतो. यशचे पात्र गुंतागुंतीचे आणि भावनिकदृष्ट्या थरारलेले असल्याचे वर्णन केले आहे. चित्रपटाच्या सारांशातील एक ओळ, “त्याच्या अंतर्मनाची खोली त्याच्या निर्णयांच्या परिणामांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे,
हा चित्रपट मूळतः कन्नड आणि इंग्रजीमध्ये चित्रित करण्यात आला होता. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये मोठ्या प्रमाणात डब करून प्रदर्शित केला जाईल. यशसोबत नयनतारा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत, अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर यांसारखे अनुभवी कलाकार चित्रपटाच्या विशाल हे सुध्दा कलाकार आहेत. इतक्या मोठ्या कलाकारांचा समावेश हा चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय निर्मिती मूल्याचा पुरावा आहे. “टॉक्सिक” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या “धुरंधर 2” शी थेट स्पर्धा करण्याची शक्यता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










