Saturday, February 21, 2026
Home बॉलीवूड धुरंधर 2 चा ट्रेलर 5 मार्च रोजी प्रदर्शित होणार? मग बॉक्स ऑफिसवर तो टॉक्सिकशी देईल टक्कर

धुरंधर 2 चा ट्रेलर 5 मार्च रोजी प्रदर्शित होणार? मग बॉक्स ऑफिसवर तो टॉक्सिकशी देईल टक्कर 

रणवीर सिंग अभिनित धुरंधर चित्रपट गाजल्यानंतर, आता धुरंदर 2 ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर हा  चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये पाहता येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धुरंधर 2 चा ट्रेलर 5 मार्च रोजी प्रदर्शित होईल. मात्र, अजुन याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. 5 मार्च रोजी ट्रेलर प्रदर्शित होईल की नाही हे पाहवे लागणार आहे.

रणवीर (Ranveer)सिंग धुरंधर 2 मध्ये पुन्हा एकदा धमाल करण्यास सज्ज आहे. मात्र, या भागात अक्षय खन्नाची भूमिका दिसणार नाही आणि कथा हमजाच्या भूतकाळात डोकावेल. या कथेत रणवीर सिंगचे पात्र, हमजा, एक गुप्तहेर कसा बनला आणि त्याचा भूतकाळ कसा होता हे दाखवले जाईल. चाहते चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई होईल यासाठी अपेक्षा जास्त आहेत. दरम्यान, यश अभिनीत टॉक्सिक देखील चर्चेत आहे, त्याचा ट्रेलर आज, शुक्रवारी प्रदर्शित झाला. “टॉक्सिक” हा चित्रपट 19  मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, जो “धुरंधर 2” च्या कलेक्शनवर लक्षणीय परिणाम करू शकतो. “टॉक्सिक” चा ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांना त्याची भव्यता आधीच जाणवू लागली आहे. आता, या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतो हे पाहणे गरजेचे आहे.

“धुरंधर 2” बद्दलची चर्चा प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना, त्याच्या पहिल्या भागाची, “धुरंधर” ची क्रेझ लोकांमध्ये वाढतच आहे. चित्रपटाची गाणी, कथा आणि पात्रे सर्व सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांच्या भेटीच्या क्लिप्समध्ये “धुरंधर” मधील गाणी वापरली. शिवाय, जेव्हा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला बरेच व्ह्यूज मिळाले. तर तो नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत राहिला. चित्रपटाची क्रेझ काहीही कमी झाली नाही. तर त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. आता धुरंधर 2 देखील लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल की नाही हे पाहणे आता गरजेचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा 

द कपिल शर्मा शो मध्ये रंगणार माधुरी दीक्षित यांनी जॅकी श्रॉफ यांची मैफल, प्रोमो मध्येच विनोदाचा जबरदस्त तडका

हे देखील वाचा