Monday, February 23, 2026
Home बॉलीवूड टॉक्सिक मेकर्सचा धुरंदर फॉर्मुला का? यशच्या चित्रपटातही टीव्ही अभिनेत्रीची होणार एन्ट्री

टॉक्सिक मेकर्सचा धुरंदर फॉर्मुला का? यशच्या चित्रपटातही टीव्ही अभिनेत्रीची होणार एन्ट्री

यश हा एक कन्नड सुपरस्टार आहे ज्याचा टॉक्सिक हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, टॉक्सिक हा चित्रपट अनेक कारणामुळे रिलीजपूर्वी चर्चा आला आहे. धुरंदर आणि टॉक्सिक हा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिस वर चांगलीच टक्कर देणार आहे. तर चित्रपटात पाच अभिनेत्रींचा समावेश आहे, ज्यामध्ये एका परदेशी अभिनेत्रीचा समावेश आहे . 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या “टॉक्सिक” मध्ये यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, रुक्मिणी वसंत, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारख्या अभिनेत्री दिसणार आहेत. आता, चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची भर पडणार असल्याचे वृत्त आहे. टॉक्सिक” चे निर्माते “धुरंधर” फॉर्म्युला स्वीकारत   वापरत आहेत का, यावर चर्चा सुरू झाली आहे, कारण धुरंधर मध्ये अनेक टीव्ही स्टार्स देखील होते

मिडीया रिपोर्टनुसार प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख देखील आगामी चित्रपट “टॉक्सिक” चा भाग असणार आहे. जरी निर्मात्यांकडून किंवा स्वतः संजीदाने या वृत्तांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, असे वृत्त आहे की चित्रपटात संजीदा शेखची भूमिका छोटी पण प्रभावशाली असेल.

संजीदा शेख ही टीव्ही अभिनेत्री आहे. तिने “इश्क का रंग सफेद”, “एक हसीना थी”, “गेहरैयां” आणि “कयामत” सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिच्या कारकिर्दीत, तिने 2024 मध्ये संजय लीला भन्साळींच्या “हीरामंडी: द डायमंड बाजार” मध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ती हृतिक रोशन अभिनीत “फायटर” मध्ये देखील दिसली आहे.

टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स बद्दल बोलायचे झाले तर, सुपरस्टार यश (Yash)मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिले आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

द केरळ स्टोरी 2 च्या दिग्दर्शकाने अनुराग कश्यप यांच्यावर केली टीका, व्हिडिओ मधून व्यक्त केला रोष

हे देखील वाचा