लंडनमध्ये ब्रिटिश अकादमी फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स (बाफ्टा) रविवारी रात्री पार पडला. तर या सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थित दर्शवली. त्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टपासून ते फरहान अख्तरपर्यंत कलाकार उपस्थित होते. फरहान अख्तरच्या बूंग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट श्रेणी मध्ये गनले गेले. आलिया भट्टचापुरस्कार सोहळ्यात तिचा हा पहिलाच सहभाग होता आणि तिने तिच्या शैलीने सर्वांना चकित केले. बाफ्टा रेड कार्पेटवर, आलियाने चमकणारा, बॅकलेस गाऊन घातला होता, जो तिला अगदी आकर्षक दिसत होता. अभिनेत्रीने इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील प्रदान केला
होस्ट यांनी आलियाला (aliya)स्टेजवर बोलावले. स्टेजवर आल्यावर तिने प्रेक्षकांना “नमस्ते” म्हणत असे स्वागत केले. तर तिने तिचे भाषण हिंदीत केले आणि नंतर त्याचे इंग्रजीत भाषांतर केले. बाफ्टामधील तिच्या भाषणात, आलिया भट्ट म्हणाली, “नमस्कार, पुढचा पुरस्कार अशा चित्रपटाला जातो जो हिंदीमध्ये नाही. सबटायटल्सकडे जाऊ नका. मी हिंदीत बोलत होते, म्हणत होते की आमचा पुढचा पुरस्कार अशा चित्रपटाला आहे जो इंग्रजीमध्ये नाही.
त्यानंतर आलिया भट्टने जोआकिम ट्रियर दिग्दर्शित नॉर्वेजियन कौटुंबिक नाटक चित्रपट “सेंटीमेंटल व्हॅल्यूज” चे नाव जाहीर केले आणि बाफ्टा पुरस्कार प्रदान केला. या चित्रपटाने “इट वॉज जस्ट एन एक्सिडेंट”, “द सीक्रेट एजंट”, “सैराट” आणि “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” ला मागे टाकत पुरस्कार जिंकला.
आलियाच्या अभिनयाने लगेचच बातम्यांमध्ये स्थान मिळवले. बाफ्टाच्या इंस्टाग्राम पेजवरील आलियाच्या भाषणाच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी लिहिले, “तिचा खूप अभिमान आहे.” दुसऱ्याने लिहिले, “बाफ्टा स्टेजवर हिंदी बोलणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. आलियाचा खूप अभिमान आहे, शाब्बास! आलिया भट्ट पुढील चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या “लव्ह अँड वॉर” मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल सुध्दा असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










