Tuesday, February 24, 2026
Home बॉलीवूड नील नितीन मुकेशसोबत झाली फसवणूक , अभिनेत्याने अचानक कोट्यवधींचा करार मोडला

नील नितीन मुकेशसोबत झाली फसवणूक , अभिनेत्याने अचानक कोट्यवधींचा करार मोडला

नील नितीन मुकेश लहानपणापासूनच बालकलाकार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. उत्तम अभिनयासाठी तो आणि चित्रपटासाठी चर्चेत असतो मात्र यावेळेस तो कुठल्या चित्रपटासाठी नाही तर एका पोस्टसाठी आहे. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत नील नितीन मुकेशने “द युनिव्हर्सल आयडॉल” या गायन रियालिटी शोशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली. होय, या अभिनेत्याने गायन रियालिटी शोच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्याने आयोजकावर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. अभिनेतेने स्पष्ट केले की पैसे देतो देतो असं म्हणत अजून पर्यंत पैसे मिळाले नाही

नील नितीन मुकेशने (Neil Nitin Mukesh)पोस्टद्वारे म्हटले आहे की, “मी एचएमसी इव्हेंट्सच्या “द युनिव्हर्सल आयडल” च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदाचा औपचारिक राजीनामा देत आहे. वारंवार आश्वासने देतो म्हणत, मला मान्य केलेली रक्कम देण्यात आलेली नाही. मला देण्यात आलेले तीन चेक देखील बाउन्स झाले आहेत. हे प्रकरण अविश्वास निर्माण करणाऱ्या आहे आणि बेजबाबदार पणाच आहे. मी आणि माझ्या टीमने या समस्येचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी अनेक संधी दिल्या आहेत, परंतु दुर्दैवाने, कोणताही तोडगा निघाला नाही.

अभिनेत्याने पुढे लिहिले आहे की, “हे सर्व लक्षात घेऊन, मी युनिव्हर्सल आयडल, एचएमसी इव्हेंट्स आणि श्री. शकील हासन आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेले सर्व वर्तमान आणि भविष्यातील संबंध तात्काळ तोडत आहे. इतर कलाकार, विक्रेते आणि भागीदारांना सतर्क राहण्यासाठी आणि कोणतेही दावे, आश्वासने आणि देयकांची कसून चौकशी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मी ही नोंद शेअर करत आहे.

नील नितीन मुकेश यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात “जॉनी गद्दार” या चित्रपटातून केली. त्यानंतर तो “न्यू यॉर्क”, “प्लेयर्स”, “लफंगे परिंदे”, “प्रेम रतन धन पायो”, “वजीर”, “साहो”, “जेल” आणि “इंदू सरकार” यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

हेही वाचा 

फिल्मी खानदानातील स्टार मुलगी पण तिच्या नावाशी जोडीलेला प्रत्येक विषय ठरला वादग्रस्त

हे देखील वाचा