[rank_math_breadcrumb]

हि सिरीज ओटीटीवर करत आहे धुमाकूळ, तर IMDb वर 9.6 आहे रेटिंग

तुम्हाला जर सिरीज आणि चित्रपट हे थ्रिलरने भरलेली असे आवडत असतील तर दक्षिण भारतीय चित्रपटाने सिद्ध करत एक नवीन सिरीज घेऊन आली आहे. कन्नड मानसशास्त्रीय गुन्हेगारी आणि थ्रिलरने भरलेली वेब सिरीज म्हणजे “राक्षस”. हि सिरीज जी ओटीटी वर आता उपलब्ध झाली आहे, ही मालिका केवळ एक साधी पोलिस चौकशी नाही तर तुम्हाला गूढता, भीती आणि मानसिक तणावात खोलवर घेऊन जाणारा प्रवास दर्शवते.  यांचे दिग्दर्शन सुहान प्रसाद यांनी केले आहे.

कथेची सुरुवातीला भयानक दृश्य आहे मलप्रभा नदीच्या काठावर अर्धकुजलेल्या मृतदेहांच्या शोध सुरु असतो . सुरुवातीला, गावकरी आणि प्रशासन मगरींच्या हल्ल्यामुळे झालेल्या या मृत्यूंना नाकारतात. पण जसजसा तपास पुढे सरकतो तसतसे कथा एक वेगळ वळण घेते. गावातील खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा आणि स्थानिक श्रद्धा यांच्यामध्ये अडकलेले, उपनिरीक्षक हणमप्पा, ज्याची भूमिका ज्येष्ठ अभिनेते विजय राघवेंद्र यांनी पूर्ण केली आहे, ते या प्रकरणाची जबाबदारी घेतात. हणमप्पा यांना खात्री आहे की या मृत्यूंमागे प्राणी नाही तर एक अतिशय धूर्त आणि क्रूर मानवी मन आहे. विजय राघवेंद्रचा अभिनय इतका स्पष्ट आहे की तुम्हाला त्याच्यासोबतच्या केसचा गुदमरलेला तणाव जाणवतो.

सुहान (suhan)प्रसाद आणि अपूर्व कुमार दिग्दर्शित, हि सिरीज प्रत्येक क्षणी सस्पेन्स वाढवते. छायांकन आणि पार्श्वसंगीत एकत्रितपणे एक असे वातावरण तयार करते तुम्ही त्यात मग्न होता. विजय राघवेंद्र व्यतिरिक्त, मयुरी क्यातारी, अप्पन्ना रामदुर्गा, अविनाश आणि जहांगीर एमएस सारख्या कलाकारांनी त्यांच्या शक्तिशाली अभिनयाने त्यांच्या पात्रांमध्ये जीव ओतला आहे. तरुण सुधीर यांनी निर्मितीचे दिग्दर्शन केले आहे, ज्यामुळे मालिकेची गुणवत्ता जागतिक दर्जाची आहे.

जर तुम्हाला ती कुठे पहायची असा प्रश्न पडत असेल, तर “राक्षस” सध्या ZEE5 वर प्रसारित होत आहे. जरी ती मूळ कन्नडमध्ये असली तरी, इतर भाषांमध्ये प्रेक्षकांसाठी सबटायटल्स उपलब्ध आहेत. या सात भागांच्या मालिकेचा पहिला भाग विनामूल्य उपलब्ध आहे, याला  9.6 IMDb रेटिंग आहे. रेटिंग कालांतराने बदलू शकते, परंतु सुरुवातीच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की ही मालिका एक कल्ट क्लासिक बनण्याच्या मार्गावर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या वयात किती अंतर आहे? घ्या जाणून