Friday, February 27, 2026
Home साऊथ सिनेमा थलापती विजयची पत्नी संगीता सोरनालिंगम यांनी घटस्फोटासाठी केला अर्ज दाखल, हे जोडपे 27 वर्षांच्या लग्नानंतर होणार वेगळे

थलापती विजयची पत्नी संगीता सोरनालिंगम यांनी घटस्फोटासाठी केला अर्ज दाखल, हे जोडपे 27 वर्षांच्या लग्नानंतर होणार वेगळे

विजय थलापती हा दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहे. दरम्यान एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे आज 27  फेब्रुवारी 2026 रोजी पत्नी संगीता सोरनालिंगम यांनी चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 27 वर्षांच्या लग्नानंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. विजयने  अद्याप या प्रकरणावर अधिकृत निवेदन दिलेले नाही.

दक्षिण भारतीय अभिनेता विजय (Vijay)आणि संगीता सोरनालिंगम यांनी 25 ऑगस्ट 19999 रोजी सर्व प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत लग्न केले. विजय ख्रिश्चन आहे, तर संगीता हिंदू आहे. या जोडप्याने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले, त्यानंतर चेन्नईमध्ये एक भव्य स्वागत समारंभ आयोजित केला.

लग्नानंतर विजय आणि संगीता  सोरनालिंगम यांनी 26 ऑगस्ट 2000 रोजी त्यांच्या पहिल्या मुलाला, एका मुलाचे स्वागत केले. या जोडप्याने त्याचे नाव जेसन संजय विजय ठेवले. 2005 मध्ये विजय आणि संगीताला एका मुलीचा जन्म झाला, तिचे नाव दिव्या साशा असे आहे. थलापती विजयची मुले जेसन संजय आणि दिव्या साशा यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही हळूहळू प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. सुपरस्टार थलापती विजयचा मुलगा जेसन संजय याने तमिळ चित्रपट उद्योगात दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

संगीता सोरनालिंगम ही थलापती विजयची पत्नी आहे. ती श्रीलंकेच्या तमिळ कुटुंबातील आहे पण ती युनायटेड किंग्डममध्ये वाढली आहे. विजय आणि संगीताचे लग्न जवळजवळ 27 वर्षांपुर्वी झाले आहे. संगीताने नेहमीच कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाला प्राधान्य दिले आहे, तेही चकाचक जगापासून दूर राहणे पंसद केले. ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसते. विजय तिचे फोटो सोशल मीडियावर क्वचितच पोस्ट करते. शिवाय, संगीता सोशल मीडियावर कमी सक्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

शुद्धीवर आले तेव्हा वेदना असाह्य होत्या, शस्त्रक्रियेनंतर दीपिकाला अश्रू झाले अनावर

हे देखील वाचा