काही कलाकार हे छोटीशी भूमिका करून हे पडद्यावर आपली छाप सोडतात, अशीच एक अभिनेत्री म्हणजे हेजल कीच आहे. तिने ब्लॉकबस्टर “बॉडीगार्ड” चित्रपटांत एका सहकालाकाराची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेहेजल कीच आज हिचा वाढदिवस आहे. कीचला रोज डॉन आणि लग्नानंतर गुरबसंत कौर म्हणूनही ओळखले जाते. बॉडीगार्ड या चित्रपटामध्ये तिने करीना (Karina) सोबत तिझ्या मैत्रिणीची भूमिका आणि सलमान खानची नायिका म्हणून काम केले होते.
“बॉडीगार्ड” मध्ये तिचा मर्यादित स्क्रीन वेळ असूनही, तिच्या नैसर्गिक ऑन-स्क्रीन अभिनयामुळे ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. चाहते अजूनही हेजलला मायाच्या भूमिकेसाठी आठवतात आणि हा चित्रपट 2011 च्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनला. तिने बिल्ला आणि मॅक्सिमम सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे आणि “बिग बॉस 7” मध्येही दिसली आहे. ती ब्लॉकबस्टर “हॅरी पॉटर” चित्रपट सिरिजचा भाग देखील होती. ती “हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स” 2002 आणि “हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर” 2005 मध्ये दिसली आहे. आता, हेजल कीच मोठ्या पडद्यावरून पूर्णपणे निवृत्त झाली आहे आणि तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.
15 वर्षांनंतर “माया” च्या भूमिकेत दिसणारी हेजल कीच पूर्णपणे बदलली आहे. स्टार क्रिकेटर युवराज सिंगशी लग्न केल्यापासून ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आज, हेजल दोन मुलांची आई आहे आणि तिच्या दिसण्यात लक्षणीय बदल झाला आहे, परंतु तिचे सौंदर्य अजूनही बदललेले नाही. ती सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. हेजल कीच शेवटची 2015 मध्ये आलेल्या ‘बांके की क्रेझी बारात’ या चित्रपटात दिसली होती, त्यानंतर तिने 2016 मध्ये युवराज सिंगशी लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
28 फेब्रुवारीला मिळणार मोठं सरप्राईज, लग्नानंतर राणाबलीमध्ये एकत्र झळकणार विजय आणि रश्मिका










