थलापती विजय हा लोकप्रिय अभिनेता आहे. तर तो नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याचा शेवटचा चित्रपट “जाना नायकन” अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तर त्याचे पूर्ण नियोजन आहे की तो राजकारणाकडे वळण्याचे मात्र अशातच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आहे. थलापती विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी नुकतीच चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र, विजयने अद्याप या प्रकरणावर अधिकृत विधान जारी केलेले नाही.
संगीता आणि विजय (Viajy)यांनी 1954 च्या विशेष विवाह कायद्याच्या कलम 27 अंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघांचे लग्न 1999 मध्ये झाले होते. त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा ही दोन मुले आहेत. मात्र, 27 वर्षांच्या लग्नानंतर विजय आणि संगीता सोर्नालिंगम यांचे नाते आता अडचणींत आले आहे. संगीताने विजयपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. आता, थलापती विजयचे चाहते संगीताबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
संगीता सोर्नालिंगम ही एका प्रसिद्ध श्रीलंकेच्या उद्योगपतीची मुलगी आहे आणि ती यूकेमध्ये वाढली आहे. मात्र तिच्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नाही. थलापती विजयने 1992 मध्ये “नालया थीरपू” या चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले आणि त्यानंतर अनेक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. चित्रपटाच्या यशानंतर, विजय त्याच्या चेन्नईमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता, तेव्हा एका फॅनगर्लने त्याच्याकडे येऊन त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आणि ही फॅनगर्ल नंतर विजयची जीवनसाथी बनली. ही फॅनगर्ल दुसरी तिसरी कोणी नसून संगीता सोर्नालिंगम होती.
संगीताने प्रस्ताव स्वीकारला आणि संगीताच्या पालकांकडून होकार मिळाल्यानंतर, दोघांनी 25 ऑगस्ट 1999 रोजी लग्न केले. एका सुपरस्टारची पत्नी असूनही, ती नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. इतकेच नाही तर विजयची मुले देखील प्रसिद्धीपासून दूर राहतात. विजय सध्या त्यांच्या शेवटच्या चित्रपट “जाना नायकन” बद्दल चर्चेत आहे, जो अजूनही अनिश्चित आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रामायण मधील सीता ठरलेली दीपिका आता झाली सासूबाई, तर लेकीच्या लग्नातील काही झलक केली शेअर..










