टायगर श्रॉफ हा लोकप्रिय अभिनेता आहे. आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट टायगरने दिले. 2014 मध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तर अभिनेता टायगर श्रॉफचा आज 36 वा वाढदिवस आहे. टायगरचे वडील जॅकी श्रॉफ देखील त्यांच्या काळात सुपरस्टार होते. टायगरने एक्शन जगातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आज तो हृतिक रोशनला टक्कर देतो.
टायगर (tiger)श्रॉफने 2014 मध्ये “हिरोपंती” या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात टायगरने दमदार एक्शन, नृत्य केले. टायगरसोबत मुख्य नायिका म्हणून कृती सॅननने काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि प्रेक्षकांनी त्याला नायक म्हणून पसंत केले. तेव्हापासून, टायगरने सातत्याने त्याच्या शरीरयष्टी, अभिनय आणि नृत्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत तो कधीही वादात अडकला नाही आणि त्याने केवळ त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे, टायगर चित्रपट पार्ट्यांमध्ये फारसा दिसत नाही. तो क्वचितच दिसतो.
टायगरने त्याच्या पहिल्या चित्रपट ‘हिरोपंती’ नंतर ‘बागी’ मध्ये काम केले. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि त्यात त्याची जोडी श्रद्धा कपूरसोबत होती. ‘बागी’ इतकी हिट झाली की त्याचे सिक्वेल बनवण्यात आले आणि आतापर्यंत दोन प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. टायगर लवकरच ‘लग जा गले’ आणि ‘स्क्रू ढीला’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. टायगरचा मागील चित्रपट ‘बागी 4’ नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चाहत्यांनी आज सोशल मीडियावर टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टायगर मुलांमध्ये एक आवडता हिरो बनला आहे आणि मुले त्याच्या फिटनेसला प्रेरणा मानतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
विपुल शाहच्या केरळ स्टोरी 2 चा बॉक्स ऑफिस कलेक्शन रविवारी कसा राहिला, घ्या जाणुन










