राजपाल यादव हा बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. त्याने त्याच्या विनोदी कलेने सर्वांच्या मनात घर निर्माण केले. मात्र 2026 च्या सुरुवातीपासून तो एका कायदेशीर अडचणीमुळे चर्चेत आला. चेक बाउन्स प्रकरणी त्याला तुरुंगात आत्मसर्पण करावे लागले. मात्र बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला मदतीचा हात दिला. अभिनेता सोनू सूद देखील या कठीण काळात राजपाल यादवला पाठिंबा देण्यासाठी पुढे आला आणि सोशल मीडियाद्वारे त्याच्यासाठी कामाची विनंती केली. मात्र सोनू सूदने कामासाठी केलेल्या विनंतीवर त्याने नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की माझ्याकडे कामाची कमतरता नाही. सोनू सूदने स्वतः आता प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू सूदने एका मुलाखतीत म्हणले, ले की त्याने कधीही राजपाल यादवला कामाची गरज असल्याचे म्हटले नाही. त्याची भूमिका स्पष्ट करताना सोनू सूद म्हणाला, “मी त्याच्यासाठी आनंदी आहे आणि मी कधीही असे म्हटले नाही की त्याला कामाची गरज आहे.” मी फक्त म्हटले आहे की, त्याला सही करा आणि त्याला एडवांस पैसे द्या, कारण तो त्याचा पात्र आहे.
सोनू सूदने काम मागितले यावर राजपाल (Rajpaal)यादव म्हणाले, “मला काम मागावे लागते हा गैरसमज त्याने दूर करायला हवा. माझ्याकडे भरपूर काम आहे आणि ते मागायला मला लाज वाटत नाही. मी माझे आयुष्य जगतो. सिनेमा हा फक्त माझ काम नाही; तो माझा छंद आहे, जो माझ्या नसांमधून वाहतो. मी अशा प्रकारे काम करतो की मला काम मागण्याची गरज पडत नाही; काम स्वतःहून माझ्याकडे येते. मी सुट्टीच्या दिवशीही काम करणे थांबवत नाही. गेल्या 11 वर्षांपासून, काम सावलीसारखे माझ्या मागे येत आहे.
राजपाल यादवने फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. 12 रात्री तुरुंगात घालवल्यानंतर, 17 फेब्रुवारी रोजी अभिनेत्याला अंतरिम जामिनावर सोडण्यात आले. राजपाल यादव 18 मार्चपर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर राहतील. 17 फेब्रुवारी रोजी, करकडडूमा न्यायालयाने रिलीज वॉरंट जारी केले, त्यानंतर त्याला तिहार तुरुंगातून सोडण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘पेड्डी’ सिनेमातील ‘चिरीकी चिरीकी’ गाणे रिलीझ; मिळाले एवढे व्ह्यूज










