Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची भुताटकीवाली होळी, हटके अंदाजात दिल्या होळीच्या शुभेच्छा

अभिनेता अक्षय कुमारची भुताटकीवाली होळी, हटके अंदाजात दिल्या होळीच्या शुभेच्छा

अक्षय कुमार हा हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आणि सध्या त्याच्या आगामी “भूत बांगला” चित्रपटासाठी तो चर्चेत आहे, तर याचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर या चित्रपटाची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच सोशल मीडियावर अक्षयने  एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ खूपच वेगळा आहे. कारण त्याने भूता सोबत होळी खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भूताच्या वेशात एक महिला त्याच्याकडे येते, ज्याच्या चेहऱ्यावर तो रंग लावतो आणि हसतो. व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या होळीत  भीती आणि द्वेषाच्या भुतांना दूर करा. तुमचे जीवन आनंदाने भरा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या शुभेच्छा. सुरक्षित होळी खेळा. अक्षयची अनोखी शैली पाहिल्यानंतर चाहते त्यावर मजेदार प्रतिक्रिया देखील देत आहेत.

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी “भूत बांगला” चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि तो अतिशय अनोख्या पद्धतीने त्याचे प्रमोशन करत आहे. त्याचा होळीच्या शुभेच्छांचा व्हिडिओ देखील त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे, ज्यामध्ये तो एका भूताच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे. अलीकडेच, या आगामी हॉरर-कॉमेडीमधील एक गाणे देखील रिलीज झाले, ज्याचे शीर्षक आहे “राम जी आके भला करेंगे”.

अक्षय कुमारचा (Akshay kumar)”भूत बांगला” हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट अनेक वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर प्रदर्शनासाठी तयार आहे. अक्षय कुमारसोबत, वामिका गब्बी, राजपाल यादव, परेश रावल, मिथुन चक्रवर्ती आणि तब्बू सारखे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

राजपाल यादवसाठी सोनू सूदने मागितली होती कामाची संधी, तर अभिनेत्याच्या नाराजीवर सोनू सूदने गैरसमज दूर करत स्पष्ट केला हेतु

 

हे देखील वाचा