Saturday, March 7, 2026
Home बॉलीवूड बादशाह त्याच्या नवीन तिहारी गाण्याने अडकला अडचणीत, हरियाणा महिला आयोगाने बजावले समन्स

बादशाह त्याच्या नवीन तिहारी गाण्याने अडकला अडचणीत, हरियाणा महिला आयोगाने बजावले समन्स

बादशाह हा एक प्रसिद्ध रॅपर आहे. अनेक उत्तम रॅप सॉंग्समुळे त्याने चहात्यांच्या मनात घर केले. करतो नेहमीच चर्चेत असतो मात्र सध्या एका सॉंग मुळे चर्चेत आहे. तर बादशाह नवीन हरियाणवी लोकगीत “तेहारी” वरून मोठ्या वादात आला आहे. अभय चौधरी यांनी बादशाहविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. काराण या गाण्यात अश्लील शब्द आणि दृश्ये आहेत, त्यामुळे हरियाणा महिला आयोगाने आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे. तर आता पंचकुला येथील सेक्टर 20 येथील सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये रॅपरविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे.

महिला आयोग तक्रारीनुसार, बादशाहच्या (badshah)अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज झालेल्या या गाण्यातील व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशातील मुलींचे आक्षेपार्ह भाषा, दृश्ये आहेत. तक्रारदाराचा दावा आहे की हे घटक अत्यंत आक्षेपार्ह आहेत आणि समाजाला नकारात्मक संदेश देतात. या गाण्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की ही सामग्री अश्लीलतेला प्रोत्साहन देते आणि महिलांच्या प्रतिष्ठेला कमी करते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 296 आणि महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व कायदा, 1986 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे. रॅपरवर गाण्यात अल्पवयीन मुलींचे अनुचित चित्रण केल्याचाही आरोप आहे. यापूर्वी, पानिपतच्या सविता आर्य आणि रोहतकचे वकील राजनारायण पंघाल यांनी दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या होत्या.

सविता यांनी हरियाणा महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली , तर पंघाल यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल केली. दोघांनीही “तेहारी” या गाण्यातील ओळीवर आक्षेप घेतला, “आया बादशाह डोली चढणे, इन सबकी घोडी बनाने. बादशाहचे हे गाणे 1 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी भारतीय दंड संहिता  अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

जान्हवी कपूर २९ व्या वाढदिवशी तिरुमला मंदिरात पोहोचली, ३५०० पायऱ्या अनवाणी चढली आणि देवाचे घेतले आशीर्वाद

हे देखील वाचा