Sunday, May 3, 2026
Home बॉलीवूड धुरंदर 2; तिकीट 3100 रुपये, तरीही धुरंदर 2 चित्रपटाचे शो होत आहेत हाउसफुल

धुरंदर 2; तिकीट 3100 रुपये, तरीही धुरंदर 2 चित्रपटाचे शो होत आहेत हाउसफुल

रणवीर सिंग हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे तर सध्या तो त्याच्या धुरंदर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर रणवीर सिंग अभिनित धुरंदर हा चित्रपट प्रचंड गाजला यानंतर आता याचा सेकंड पार्ट तो म्हणजे धुरंधर: द रिव्हेंज येत आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. तर या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग मधून तब्बल वीस कोटी रुपये कमावले आहेत.

आदित्य धर (Dhar)दिग्दर्शित हा चित्रपट रिलीजपूर्वीच प्रचंड गाजत आहे. तर धुरंधर 2″ च्या निर्मात्यांनी 18 मार्च रोजी संध्याकाळी चित्रपटाचे प्रदर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 19 मार्च रोजी सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होईल. प्रमुख मल्टिप्लेक्समध्ये शो दुपारी 4 वाजता चित्रपटाचे प्रदर्शन सुरू होईल. मोठ्या शहरात तर या ऍडव्हान्स तिकिटांची किंमत 600 ते 900 रु. दरम्यान विकली जात आहेत. तर मुंबईतील बोरिवली येथील आयनॉक्स मेगाप्लेक्समध्ये, रिक्लाइनर सीटची किंमत 3100 पर्यंत पोहोचली आहे, दिल्लीतील पीव्हीआर सिलेक्ट सिटीमध्ये 2400 इतकी आहे. चित्रपट तज्ञांचा असा विश्वास आहे की बुकिंगचा वेग पवन कल्याणच्या “ओजी” ने मिळवलेल्या संपूर्ण भारतात 25 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकेल.

धुरंदर 2 ची कथा पुन्हा एकदा रणवीर सिंगभोवती फिरते, जो पाकिस्तानी भूमीवर भारतीय गुप्तहेर म्हणून काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात प्रभावी स्टारकास्ट आहे, ज्यामध्ये आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, दानिश पांडोर, राकेश बेदी आणि सारा अर्जुन सारखे अनुभवी कलाकार आहेत. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर 1300 कोटींची कमाई केली आणि बॉलीवूडचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा 

“शाका लाका बूम बूम” मधील संजू आठवतोय का? हा गोंडस मुलगा 26 वर्षानंतर दिसतो आता हैंडसम हंक

हे देखील वाचा