धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. तर याचा दुसरा भाग ही लवकरच प्रदर्शित होतात आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्वेच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. तर याचे दिग्दर्शक आदित्य धर हे आहे. आदित्य यांनी उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले. धुरंदर प्रदर्शित झाल्यानंतर आदित्य धार यांचे अनेक लोकांनी कौतुक ही केले होते. आणि आता धुरंधर 2 हा चित्रपट 19 मार्च रोजी अधिकृतपणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षक आदित्य धर (Dhar) दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ चा प्रीमियर शो आज, 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. आज संध्याकाळी पहिल्या शो नंतर, या 3 तास 49 मिनिटांच्या कथेतील सर्व रहस्ये सोशल मीडियावर उघड केली जातील. तर दिग्दर्शक आदित्य धर यांनी कथेच्या प्रत्येक पैलूबाबत गुप्तता पाळली आहे. चित्रपटातील कलाकारही कोणत्याही मुलाखती देत नाहीत आणि राकेश बेदी सध्या आपल्या कुटुंबासोबत डोंगराळ भागात सुट्टी घालवत आहेत. असेही वृत्त आहे की दिग्दर्शक आदित्य धर यांनी चित्रपटाच्या कलाकारांना प्रदर्शनापूर्वी कोणत्याही माध्यमांशी संवाद टाळण्याचा सल्ला दिला आहे.
‘धुरंधर 2’ या चित्रपटाची आंदाजानुसार पहिल्या दिवसाची कमाई 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकते. आतापर्यंत, या चित्रपटाला एकट्या भारतातच 47 कोटी रुपयांपेक्षा जास्त आगाऊ बुकिंग मिळाले आहे. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर 2’ ने प्रदर्शनापूर्वीच 60 कोटी रुपये कमावले आहेत. मात्र, महाराष्ट्रात सर्वाधिक तिकिटांची विक्री झाली असून, ॲडव्हान्स कमाई 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










