Wednesday, March 18, 2026
Home साऊथ सिनेमा साउथची 8.4 IMDb रेटिंग असलेली जबरदस्त फिल्म, क्लायमॅक्स पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

साउथची 8.4 IMDb रेटिंग असलेली जबरदस्त फिल्म, क्लायमॅक्स पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

आजकाल ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट सोबतच दक्षिणात्य चित्रपटांनी सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे. असाच एक दक्षिणात्य चित्रपट म्हणजे धंदोरा. हा एक सामाजिक नाट्यपट आहे. क्लायमॅक्स आणि नंतर असे काही घडते कि ते तुम्हाला थक्क करून सोडेल.

‘धंदोरा’ची कथा आपल्याला 2004 सालच्या ग्रामीण भारतात घेऊन जाते, जिथे जातीयवाद खोलवर रुजलेला होता. हा चित्रपट केवळ एक साधी प्रेमकथा नाही, तर समाजातील त्या काळ्या सत्यांना उघड करतो ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. चित्रपटाची सुरुवात एका हृदयद्रावक दृश्याने होते, ज्यात एका वृद्ध महिलेचा मृतदेह दोरीने खाली उतरवला जात असल्याचे दाखवले आहे. याचे कारण असे आहे की, ज्या पारंपरिक मार्गावरून अंत्ययात्रा जाणार होती, त्या मार्गावर उच्च जातीच्या लोकांनी एक मंदिर बांधले आहे.

हा चित्रपट शिवाजीवर केंद्रित आहे, जो एक प्रभावशाली आणि कडक जमीनदार आहे. जेव्हा शिवाजीची मुलगी सुजाता रवी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते, तेव्हा कथेला एक मोठे वळण मिळते. कारण रवी (ravi)एका मागासलेल्या जातीचा असतो, जे या प्रभावशाली कुटुंबाच्या शिष्टाचार आणि परंपरांच्या विरोधात जाते. अशी हि कथा पुढे अनेक वळण घेते. आणि हा चित्रपट जानेवारी 2026 मध्ये OTT वर प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

कंगनाने केली नोरा फतेहीच्या ‘सरके चुनर तेरी’ गाण्यावर टीका; म्हणाली, ‘अश्लीलतेची मर्यादा ओलांडली आहे’

हे देखील वाचा