मनोज तिवारी हे एक गायक आहेत. तर त्यांना त्यांच्या चाहत्यांसाठी एक आंनदाची बातमी आणली आहे. 19 मार्च रोजी चैत्र पवित्र महीना सुरु होत आहे. तसेच श्रद्धेने भरलेल्या या पवित्र सणात देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तर याच मुहूर्तावर भोजपुरी गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी आपले ‘देवी’ गीत प्रदर्शित केले आहे. तर या गीतात, आदिशक्तीच्या नऊही रूपांना जन्म देणाऱ्या मातेच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे. तर मनोज तिवारी यांच्या पहिल्या चैत्र नवरात्री भक्तीगीताचे, ‘ममता की छाँव’, गीत प्रसिद्ध झाले आहे.
मनोज (manoj)तिवारी यांचे हे नवीन ‘देवी’ गीत, जन्म देणाऱ्या आईच्या रूपात मातृदेवीच्या नऊ रूपांचे चित्रण करते आणि एक सुंदर कथा सादर करते. हे गीत दाखवते की, माता आपल्या मुलांना जन्म दिल्याच्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत, त्यांच्यासाठी सर्वस्व त्याग करून त्यांची कशी काळजी घेतात. हे मनोज तिवारी यांनी या गाण्यात दाखवली आहे.
‘ममता की छाँव’ हे गीत मृदुल भक्ती टीव्हीवर प्रदर्शित झाले. हे गीतही मनोज तिवारी यांनीच लिहिले आहे. या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे, मनोज तिवारी यांनी हे गीत गीतकार डी. ब्रूक यांच्यासोबत गायले आहे. या भक्तीगीताचे संगीत व्ही. के. बीट्स यांनी दिले आहे. डी. ब्रुक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल असे आहेत: “ममता भी तू, शक्ती भी तू, माँ भी तू, जगदंबा भी तू, ही कथा फक्त माझी नाही, तर प्रत्येक मुलाची आहे ज्याच्यासाठी त्याची आईच त्याचे जग आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
22 व्या वर्षी 100 पुत्रांची आई बनलेली महाभारतची ही अभिनेत्री, 38 वर्षानंतर इतकी बदलली की ओळखनही अवघड


