Monday, March 23, 2026
Home वेबसिरीज 8 एपिसोडची हि सीरीज, तंत्र-मंत्र आणि भीतीदायक रहस्यांनी भरलेली कथा, अन् असा मृत्यूचा खेळ पाहून अंगावर येईल काटा

8 एपिसोडची हि सीरीज, तंत्र-मंत्र आणि भीतीदायक रहस्यांनी भरलेली कथा, अन् असा मृत्यूचा खेळ पाहून अंगावर येईल काटा

आजकाल Ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे Ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. आणि बऱ्याच प्रेक्षकांना सस्पेन्स तसेच रहस्यमय कथा आवडत असतात. तर ओटीटी प्लॅटफॉर्म वरती अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी सस्पेन्स आणि रहस्य अशा पद्धतीचे प्रेक्षकांना कथा दिल्या आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे अशीच एक कथा म्हणजे 1970 च्या दशकातील ही एक रहस्यमय कथा आहे. हे सिरीज म्हणजे मनमत मर्डर्स. 

‘मनमत मर्डर्स’ ही कथा लोकांना अंगावर काटा आणणारी क्राईम थ्रिलर आहे, आणि हि कथा सत्य घटनांवर आधारित आहे.ही कथा प्रामुख्याने मनमत नावाच्या एका शांत आणि वरवर पाहता सामान्य दिसणाऱ्या गावाभोवती फिरते, जिथे अचानक हत्यांची मालिका सुरू होते. ही कथा एका चलाख आणि विक्षिप्त मारेकऱ्याभोवती फिरते, जो प्रत्येक खून एखाद्या कोड्याप्रमाणे करतो. मनमत मर्डर्स’ या मध्ये मानवी भावना आणि गुन्हेगारीची काळी छाया दाखवली आहे.

‘मानवत मर्डर्स’ या मालिका 1970 च्या दशकातील त्या प्रसिद्ध हत्याकांडांवर आधारित आहे, तसेच या मालिकेत आशुतोष गोवारीकर यांनी रामकांत कुलकर्णी यांची भूमिका साकारली असून, त्यांच्यासोबत सई (sai)ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे आणि किशोर कदम यांच्याही भूमिका आहेत. या डार्क क्राईम थ्रिलरचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या मालिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, IMDb वर तिला 10 पैकी 7.1 रेटिंग मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

तारक मेहता का उल्टा चश्मा; या सिरीयल मधील दया-सुंदरसह या कलाकारांची सुद्धा आहे खऱ्या आयुष्यातील नात्यांची अनोखी गोष्ट

हे देखील वाचा