आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. तसेच आता ‘धुरंधर 2 मधील आर. माधवनने साकारलेल्या यांच्या सिगारेट ओढतानाच्या दृश्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता.
अभिनेता आर. माधवनने त्याच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटातील एका दृश्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर या विषयावर भाष्य केले आणि आपल्या चाहत्यांना व शीख समुदायाला आश्वासन दिले की, कोणालाही दुखावण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही. या संदेशात आर. माधवन म्हणाला, “धुरंधर 2च्या कुटुंबाच्या वतीने, तुमच्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.
आम्हाला नुकतेच कळले की, चित्रपटातील एका दृश्यात मी गुरु गोविंद सिंग यांच्या ‘दसम ग्रंथा’तील ओळी म्हणताना सिगारेट ओढल्यामुळे काही लोक नाराज झाले आहेत. धूर तिथे आहे हे अजिबात खरे नाही.” मला आदित्य धरने (Dhar) ही ओळ बोलण्यापूर्वी माझी सिगारेट विझवायला सांगितली होती. ‘म्हणून मी सिगारेट विझवली. आणि जर तुम्ही ते दृश्य पाहिले, तर तुम्हाला माझ्या तोंडातून धूर येताना दिसणार नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
33 वर्षांपूर्वीचा हा भुताटकी शो, आजच्या हॉरर मालिकांपेक्षा अजूनही ठरतो भारी










