Thursday, March 26, 2026
Home बॉलीवूड संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

संजय दत्त हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. नेहमीच त्याच्या उत्तम चित्रपटामुळे ते चर्चेत असतात. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि ते गाजले सुद्धा आहेत. संजय दत्त यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात या अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. तर ते सध्या त्यांच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. धुरंधर 2 मधील एपीसी अस्लम चौधरीच्या भूमिकेतील त्याचे चित्रण प्रेक्षकांना खूप आवडले होते. संजय दत्तच्या आगामी ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.  

संजय दत्त (dutt)अभिनीत आखिरी सवाल या चित्रपटाची घोषणा झाली आहे आणि आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एका दमदार पोस्टरसोबतच निर्मात्यांनी संजू बाबाच्या पडद्यावरील पुनरागमनाची घोषणा केली आहे. तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 15 मे 2026 ही देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘आखिरी सवाल’चे हे पोस्टर चित्रपटाचे गांभीर्य दिसुन येत आहे. संजय दत्तचा गंभीर चेहरा, त्याभोवती असलेले मोठे प्रश्नचिन्ह पोस्टरला अधिक आकर्षक बनवते. ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढते आहे.

‘आखिरी सवाल’ या या चित्रपटाची नीम ट्री एंटरटेनमेंट, निखिल नंदा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हॉटस्टार आणि इतर प्लॅटफॉर्मसाठी अनेक प्रकल्प आधीच पूर्ण केले आहेत. ‘आखिरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा आणि धनराज नाथवानी प्रस्तुत, या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून, पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंग, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सह-निर्माते आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

एक वर्षापूर्वी ट्रेलर रिलीज होऊनही रखडली राजकुमार राव यांची फिल्म, आता होणार OTT वर दमदार एन्ट्री

हे देखील वाचा