Friday, March 27, 2026
Home साऊथ सिनेमा ह्या आभिनेत्याला राजामौलींच्या चित्रपटातून मिळाली ओळख, वडिलही आहेत या इंडस्ट्रीत मोठे स्टार

ह्या आभिनेत्याला राजामौलींच्या चित्रपटातून मिळाली ओळख, वडिलही आहेत या इंडस्ट्रीत मोठे स्टार

राम चरण हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो नेहमीच त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि ते गाजले सुद्धा आहेत. राम चरण यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात या अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. तर सुपरस्टार राम चरण यांचा आज 41वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आता त्याचे चाहते आणि चित्रपट कलाकारांनी त्याला या विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार राम (ram)चरण राम चरणने आपल्या एका चित्रपटातील गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कारही जिंकला आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, राम चरणचे वडीलही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार आहेत. मात्र, राम चरणला चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून देणारी व्यक्ती दुसरे कोणी नसून एस. एस. राजामौली आहेत. त्यांच्या ‘मगधीरा’ या चित्रपटाने त्यांना चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळवून दिली.

राम चरणचा जन्म 1985 साली आजच्या दिवशी झाला होता. त्याचे वडील, चिरंजीवी, हे आहेत. वडिलांप्रमाणेच मुलानेही चित्रपट नायक बनण्याचा निर्णय घेतला. राम चरणने आपले शालेय शिक्षण चेन्नई, हैदराबाद येथे पूर्ण कले. 2007 साली राम चरणने ‘चिरुथा’ या आपल्या पहिल्या चित्रपटात काम केले. 2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘मगधीरा’ या चित्रपटाने त्याला प्रचंड ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शनही एस.एस. राजामौली यांनीच केले होते. या चित्रपटाने राम चरणला चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळवून दिली. राम चरण यांनी आतापर्यत 19 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

जबरदस्त सस्पेन्सची क्राइम थ्रिलर, या चित्रपटाचे दोन्ही भाग हिट, तर आता OTT वर धडाकेबाज करणार एन्ट्री

हे देखील वाचा