वरुण धवन हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो नेहमीच त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि ते गाजले सुद्धा आहेत. वरुण धवन यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात या अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. तर तो सध्या त्याच्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. वरुण धवनने 2021 मध्ये नताशा दलाल हिच्याशी लग्न केले आणि 2024 मध्ये त्यांना 1 मुलगी झाली तिचे नाव त्यांनी लारा असे ठवले आहे. तर आता लारा बाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की लारा धवनला चालताना त्रास होतो आणि त्याचे कारणही सांगितले.
‘बी अ मॅन, यार,’ च्या एका अलीकडील एपिसोडमध्ये, वरुणने खुलासा केला की त्याच्या मुलीला डीडीएच म्हणजेच डेव्हलपमेंटल डिस्प्लेसिया ऑफ द हिप) नावाचा आजार आहे, ज्यामुळे तिला व्यवस्थित चालता, धावता येत नाही. त्याने सांगितले की तिच्यावर एक शस्त्रक्रिया झाली असून ती आता बरी होत आहे. वरुणने सांगितले की लारा दीड वर्षांची असताना तिला डीडीएचचे निदान झाले होते. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हिप सॉकेटमधून हिप बाहेर येतो. एक पाय लहान होतो, ज्यामुळे तो वाकडा होतो. त्यामुळे ती व्यवस्थित चालू किंवा धावू शकत नाही.
वरुण (varun)धवनने सर्व पालकांना त्यांच्या मुलांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवा असे म्हणले आहे. आणि मुलाच्या विकासाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये काही असामान्य आढळल्यास बालरोगतज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहनही केले. वरुणने चाहत्यांना त्याच्याकडे सहानुभूतीने न पाहण्याची विनंती केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मनोज बाजपेयी यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लावली हजेरी; व्यक्तिमत्व हक्कांविषयी केले भाषण










