Saturday, March 28, 2026
Home वेबसिरीज प्राइम व्हिडिओवरील दमदार सिरीज, पहिल्या 9 एपिसोड्सनी जिंकली मनं, तर आता येतोय पार्ट 2

प्राइम व्हिडिओवरील दमदार सिरीज, पहिल्या 9 एपिसोड्सनी जिंकली मनं, तर आता येतोय पार्ट 2

आज-काल ओटीटी कंटेंट पाण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण ओटीटीवर नवनवीन कन्टेन्ट तसेच घरबसल्या अनेक प्रकारच्या सिरीज मालिका चित्रपट पाहू शकतो. आणि जर तुम्हला ‘सपंचायत’ आणि ‘चाचा विधायक हैं यासारख्या सिरीज  तुम्हला आवडत असतील तर या सारखीच एक सीरीज म्हणजे ‘टू-व्हीलर. तर आता या सिरीजची दुसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.

‘टू-व्हीलर’ यात हलकीफुलकी कॉमेडी आणि काही भावनिक क्षण आहेत. त्यामुळे प्रक्षकांना हि सिरीज आपलीशी वाटते. तर या मध्ये गजराज राव, रेणुका (renuka)शहाणे, भुवन अरोरा, स्पर्श श्रीवास्तव, शिवानी रघुवंशी आणि यशपाल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या ओटीटी सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला आणि दिग्दर्शिका सोनम नायर यांच्या ‘टू-व्हीलर’च्या दुसऱ्या सीझनची मागणीही झाली होती. याचा पहिला सीझन 7 मार्च, 2025 रोजी प्रदर्शित झाला आणि IMDb वर 7.4 रेटिंग मिळवून तो यशस्वी ठरला. आता, निर्मात्यांनी ‘टू-व्हीलर सीझन 2′ ची घोषणा केली आहे. पण,’टू-व्हीलर सीझन 2’ बाबत निर्मात्यांनी अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

‘टू-व्हीलर’ हा एक हिंदी कॉमेडी-ड्रामा वेब सिरीज आहे. जी प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे. याची कथा बिहारमधील धडकपूर नावाच्या एका काल्पनिक गावात घडते. जे गाव गुन्हेगारीमुक्त असल्याचा दावा करते. लग्नाच्या विधींच्या अवघ्या आठ दिवस आधी, हुंडा म्हणून खरेदी केलेली एक मौल्यवान रॉयल एनफिल्ड मोटरसायकल चोरीला जाते. तेव्हा कथेला सुरुवात होते. कथेचा शेवट पाहताना तुम्ही भावूक व्हाल. जिथे हुंड्यामुळे गावात मोठा गदारोळ होतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

गुपचूप ‘धुरंधर 2’ पाहायला पोहोचली यामी, स्वतःचा कॅमिओ दिसताच लाजेने लाल झाले गाल

 

हे देखील वाचा