आज-काल ओटीटी कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण ओटीटीवर नवनवीन कन्टेन्ट तसेच घरबसल्या अनेक प्रकारच्या सिरीज मालिका चित्रपट पाहू शकतो. बऱ्याच प्रेक्षकांना सस्पेन्स तसेच रहस्यमय कथा आवडत असतात. तर ओटीटी प्लॅटफॉर्म वरती अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी सस्पेन्स आणि रहस्य अशा पद्धतीचे प्रेक्षकांना कथा दिल्या आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. तर अशीच एक सिरीज म्हणजे पाच वर्षांपूर्वी, 2021 मध्ये, कोविडच्या काळात एक वेब सिरीज प्रदर्शित झाली होती, ज्यात सामान्य विद्यार्थ्यांच्या कथा अशा प्रकारे पडद्यावर मांडण्यात आल्या होत्या की लोक तिच्या प्रेमात पडले.
या सिरीजमधील प्रत्येक पात्र लोकांना आपलेसे वाटले. लोकांना ही सिरीज इतकी आवडली की तिला IMDb वर 9.2 चे रेटिंग मिळाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक रेटिंग आहे. गेल्या काही वर्षांत अनेक सिरीज आल्या आणि गेल्या, पण कोणीही या सिरीजचा हा विक्रम मोडू शकले नाही. याची निर्मिती TVF ने केली आहे. तर मालिकेचे नाव म्हणजे ‘ॲस्पिरंट्स’. ही मालिका UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन आणि संघर्ष साध्या, सूक्ष्म आणि बारकाव्यांनी युक्त अशा पद्धतीने चित्रित करते.
ॲस्पिरंट्स या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. तर या मालिकेत अभिलाष, गोरी (gori)आणि एसके या तीन मित्रांची कथा दर्शवते, जे परीक्षेच्या तयारीदरम्यान भेटतात. अभ्यास आणि संघर्षाच्या दरम्यान त्यांची मैत्री अधिक घट्ट होते. तसेच पुढे अभिलाष अनेक गोष्टी पणाला लावून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करतो. यामुळे त्याची गोरी आणि एसकेसोबतची मैत्री तुटते आणि त्यांचे मार्ग वेगवेगळे होतात.तर ही मालिका तुम्ही ‘ॲस्पिरंट्स’ प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंधर 2मुळे 37 वर्षांपूर्वीचं गाणं पुन्हा चर्चेत, यासाठी मूळ गायिकेने मानले आभार










