[rank_math_breadcrumb]

राहुल अरुणोदय बॅनर्जीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट होतीय वायरल, 43 व्या वर्षी निधन झाल्याने चाहत्यांना धक्का

राहुल बॅनर्जी हा एक प्रसिद्ध बंगाली अभिनेता आहे. तर यांच्या बाबत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हि घटना म्हणजे यांच्या आकस्मिक निधन झाले आहे. आणि हि घटना 29 मार्च 2026 रोजी घडली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ओडिशामधील तालसारी समुद्रकिनाऱ्यावर बुडून या अभिनेत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना दिघा येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. पण नंतर त्याला तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बंगाली अभिनेते राहुल (rahul)अरुणोदय बॅनर्जी याचे वय अवघे 43 होते. आणि 43व्या वर्षी त्यांनी पत्नी आणि मुलांना मागे सोडले आहे. राहुलचे चाहते आणि सहकलाकार अजूनही या दुःखातून सावरत असतानाच, अभिनेत्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट समोर आली आहे.तर हि शेवटची पोस्ट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.राहुल  बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो आता व्हायरल होत आहे.

राहुलच्या इंस्टाग्राम हँडलवर 40000 हून अधिक फॉलोअर्स आणि 1000 हून अधिक पोस्ट्स आहेत. त्यांच्या अकाऊंटवरील ही शेवटची पोस्ट राहुल आणि ‘सहज कथा’ अकाऊंटची संयुक्त पोस्ट आहे. ‘सहज कथा’ हा राहुलचा पॉडकास्ट शो होता. या क्लिपमध्ये राहुल, अभिनेते आणि राजकारणी ब्रत्या बसू यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच जो दोन दिवस आधी, 27 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. बंगाली अभिनेता राहुलने त्याच्या मृत्यूच्या चार दिवस आधी, 25 मार्च रोजी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला होता. तर तो त्या पोस्टमध्ये त्याच्या सहकलाकारांसोबत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

धुरंधर 2मुळे 37 वर्षांपूर्वीचं गाणं पुन्हा चर्चेत, यासाठी मूळ गायिकेने मानले आभार