Friday, May 22, 2026
Home साऊथ सिनेमा कथानार या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर झाला प्रदर्शित

कथानार या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर झाला प्रदर्शित

‘होम’च्या यशानंतर पाच वर्षांनी पुनरागमन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रोजिन थॉमस यांनी दिग्दर्शित केलेला आगामी चित्रपट म्हणजे कथानार होय. आणि याबाबत एक महत्वाची अपडेट आहे, तर यांचा आता बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटांची प्रेक्षक खुप दिवसांपासुन वाट पाहत होते. कारण हा चित्रपट, जागतिक स्तरावर एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. तर सखोल संशोधन आणि बारकाव्यांवर बारकाईने लक्ष देऊन तयार केलेला हा ट्रेलर, एका दृश्यात्मक समृद्ध आणि आकर्षक कथेची झलक दाखवतो.

कथानार या चित्रपटात जयसूर्या मुख्य भूमिकेत आहे. तसेच त्याला अनुष्का शेट्टी आणि प्रभू देवा (deva)यांच्यासह एका दमदार कलाकार समूहाची साथ लाभली आहे. जे महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. विनीत, नितीश भारद्वाज, हरीश उथमन आणि कुलप्रीत यादव यांसारखे सहाय्यक कलाकार या चित्रपटाची बांधणी आणखी मजबूत करतात. ‘कथानार’ला एक जागतिक चित्रपट म्हणून सादर केले जात आहे. तर हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कथानार हा चित्रपट श्री गोकुळम मुव्हीजच्या बॅनरखाली गोकुळम गोपालन यांनी निर्मित केला आहे. सर्वात मोठ्या भारतीय निर्मितींपैकी एक आहे. ज्यावर सुमारे 500 तंत्रज्ञांनी पाच वर्षे काम केले आहे. विशेष म्हणजे, जयसूर्याने या प्रकल्पासाठी चार वर्षे समर्पित केली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘रामायण’ फेम सुनील लहरी यांच्या घरी बनावट नातेवाईक बनून पोहोचला फॅन, अभिनेत्याने सांगितला मजेदार किस्सा

हे देखील वाचा