मोहनलाल आणि ममूटी हे एक उत्तम साउथ इंडस्ट्रीमधील अभिनेते आहे. तर यांचा ‘पॅट्रियट’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच येणार आहे आणि चित्रपटाची तारीख आता रिलीज झाली आहे. याची प्रदर्शनाची माहीती बुधवारी निर्मात्यांनी दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन महेश नारायणन केले आहे. तर हा चित्रपट 23 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात फासिल आणि नयनतारा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ममूटी मोहनलाल हे एक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
हा एक मल्याळम ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारे पोस्टर शेअर करत ममूटी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, “पॅट्रियट 1 मे 2026 पासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये.’पॅट्रियट’च्या निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलण्याचे कारण इन्स्टाग्रामवर स्पष्ट केले होते. निवेदनात म्हटले आहे, “आम्ही ‘पॅट्रियट’ सर्वोत्तम गुणवत्तेसह तुमच्यासमोर आणण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. मात्र काही अनपेक्षित परिस्थितीमुळे, चित्रपटाची 23 एप्रिलची प्रदर्शनाची तारीख काही दिवसांसाठी पुढे ढकलणे आवश्यक झाले होते.
‘पॅट्रियट’ या चित्रपटाची निर्मिती अँटो जोसेफ आणि के. जी. अनिल कुमार (kumar)यांनी अँटो जोसेफ प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली केली आहे. तर या चित्रपटात ममूटी आणि मोहनलाल यांच्या व्यतिरिक्त, या चित्रपटात फहाद फासिल, नयनतारा, राजीव मेनन, रेवती, ग्रेस अँटनी, झरीन शिहाब, श्रीपार्वती, गीती संगीता, जिनू जोसेफ, दानिश हुसेन, शाहीन सिद्दिकी, सनल अमन आणि प्रकाश बेलावडी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










